लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ ने नागपूरच्या सुरभी जैस्वाल हिला ‘अर्थ डे नेटवर्क रायझिंग स्टार’ चा किताब बहाल केला आहे. सुरभी जैस्वाल ही गेल्या सात वर्षापासून पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असून, यापूर्वी तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील सन्मानित करण्यात आले आहे.अर्थ डे नेटवर्क च्या माध्यमातून जगभरात २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस ‘अर्थ डे ’ साजरा केला होता. हे एक विश्वव्यापी अभियान असून, १९५ देशांमध्ये ५० हजार पर्यावरणवादी संस्थेच्या माध्यमातून अर्थ डे साजरा करण्यात येतो. नागपूरची ग्रीन व्हिजील ही संस्था अर्थ डे नेटवर्कशी जुळलेली आहे. गेल्या काही वर्षापासून संस्थेद्वारे शहरात अर्थ डे साजरा करण्यात येतो. ग्रीन व्हिजीलची टीम लिडर असलेली सुरभी हिने पर्यावरण शास्त्रात नागपूर विद्यापीठातून सुवर्ण पदकासह पदविका उत्तीर्ण केली आहे. सुरभी सात वर्षापासून शहरात पर्यावरण संरक्षणासाठी काम करीत असून, २०० पेक्षा अधिक अभियानाचे तिने नेतृत्व केले आहे. यात शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण, ऊर्जा बचत अभियान, नैसर्गिक संपदांचे संरक्षण, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छ भारत अभियान, अवैध झाडांची कत्तल थांबविणे यासाठी काम करणाºया सुरभीने ५० हजार विद्यार्थी व ३ लाखावर नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. तिच्या पर्यावरणाच्या कार्याची दखल घेत, अर्थ डे नेटवर्कचे रिजनल डायरेक्टर एशिया कंट्री यांनी रायझिंग स्टार हे मानांकन बहाल केले आहे. जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणवादी संस्थेने नागपुरात पहिल्यांदा हा सन्मान सुरभीला दिला आहे. यापूर्वी काश्मीरच्या बिलाल अहमद दार यांना हा सन्मान मिळाला होता.
नागपूरची सुरभी ‘अर्थ डे नेटवर्क रायझिंग स्टार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:01 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ ने नागपूरच्या सुरभी जैस्वाल हिला ‘अर्थ डे नेटवर्क रायझिंग स्टार’ चा किताब बहाल केला आहे. सुरभी जैस्वाल ही गेल्या सात वर्षापासून पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असून, यापूर्वी तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील सन्मानित करण्यात आले आहे.अर्थ ...
ठळक मुद्देपर्यावरण शास्त्रात सुवर्णपदक२०० अभियानांचे नेतृत्व