लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आम्ही शासकीय कंत्राटदार असल्याची बतावणी करून दोघांनी एका टाईल्स विक्रेत्याकडून ३ लाख, १४ हजारांचे साहित्य नेले. स्वत:च्या खात्यात रक्कम नसूनही त्यांना धनादेश दिले आणि फसवणूक केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.काजी वसिमुद्दीन रियाजुद्दीन (वय ३८, रा. बाबूलबन) यांचे गंगाबाई घाट मार्गावर ग्रेनाईट आणि टाईल्सचे शोरूम आहे. १५ एप्रिलला दुपारी ३ वाजता आरोपी खालीद देशमुख आणि परवेज देशमुख (दोघेही रा. जळगाव जामोद, बुलडाणा) हे काजी यांच्या दुकानात आले. आम्ही शासकीय कंत्राटदार आहोत, असे सांगून त्यांनी त्यांच्याकडून स्टोन तसेच टाईल्स असा एकूण ३ लाख, १४ हजारांचा माल घेतला. त्याबदल्यात आरोपींनी काजी यांना धनादेश दिला. प्रत्यक्षात आरोपींच्या खात्यात रक्कमच नव्हती. त्यामुळे तो धनादेश वटलाच नाही. काजी यांनी आरोपींकडे रकमेची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ चालवली. पुढच्या चौकशीत आरोपी शासकीय कंत्राटदार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने काजी यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी खालीद देशमुख आणि परवेज देशमुख यांची चौकशी केली जात आहे.हार्डवेअर आणि पेंट विक्रेत्यालाही गंडाशासकीय कंत्राटदार असल्याची बतावणी करून अशाच प्रकारे एका हार्डवेअर आणि पेंट विक्रेत्याला २३ लाखांचा गंडा घातल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी शहरात घडली होती. त्या आणि या घटनेत कमालीचे साम्य आहे.
नागपुरात टाईल्स विक्रेत्याला लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:18 PM
आम्ही शासकीय कंत्राटदार असल्याची बतावणी करून दोघांनी एका टाईल्स विक्रेत्याकडून ३ लाख, १४ हजारांचे साहित्य नेले. स्वत:च्या खात्यात रक्कम नसूनही त्यांना धनादेश दिले आणि फसवणूक केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देसव्वातीन लाखांच्या टाईल्स नेल्या : दिलेले धनादेश वटलेच नाही