शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

नागपूर शहरातील टॉयलेटस्ला मिळणार ‘स्मार्ट लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:00 PM

नागपूर महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा प्रस्तावनवीन मॉडेलनुसार बांधकाम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहत नाही. बांधकाम व्यवस्थित नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना शहरासाठी हे भूषणावह नाही. याचा विचार करता महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे.नागपूर शहरात सार्वजनिक ९५ मुतारी आहेत. बाजार व वर्दळीच्या भागात मुतारींची संख्या पुरेशी नाही. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने आरोग्य विभागाने नवीन ३० मुतारींच्या बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. यासाठी शहराच्या विविध भागात जागा निश्चित केलेल्या आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची झोनस्तरावरून अंमलबजावणी केली जाईल. महापालिके च्या २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पात मुतारी बांधकामासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. शहरात सार्वजनिक ९५ मुतारी आहेत. यातील अनेक मुतारींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. अशा मुतारींचे बांधकाम नवीन मॉडेलनुसार केले जाणार आहे.गडकरींच्या संकल्पनेमुळे मुतारी दुर्गंधीमुक्तकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा लाभ सर्व स्तरातील नागरिक ांना व्हावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. ‘स्वच्छालय अपनाओ, स्वच्छ भारत बनाओ’ अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. ती प्रत्यक्षात अमलात आणली आहे. शहरातील सर्व मुतारी दुर्गंधीमुक्त करण्यासाठी देशात प्रथमच आॅर्गेनिक (सेंद्रिय) पावडरचा वापर करण्यात आला. नोव्हेंबर २०१८ मध्ये नागपुरात या अभिनव अभियानाची सुरुवात केली होती. आज शहरातील मुतारी दुर्गंधीमुक्त झालेल्या आहेत

प्रस्ताव सादर केलाशहरातील सर्व मुतारींचे बांधकाम सारखे व आकर्षक असावे, यासाठी बांधकामाचे एक मॉडेल निश्चित करावे, नवीन बांधकाम करताना वा जीर्ण मुतारी नव्याने बांधताना त्याची अंमलबजावणी केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला आहे. यात शहरातील ३० मुतारींचा समावेश आहे.- डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छ भारत मिशन)नवीन पद्धतीनेबांधकाम करूमुतारी बांधकामाची जबाबदारी झोन कार्यालयांकडे सोपविली आहे. नवीन मुतारींचे बांधकाम आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार केले जाईल. तसेच जीर्ण वा मोडकळीस आलेल्या मुतारींचे बांधकाम त्या स्वरूपाचे केले जाईल. यामुळे मुतारीला आकर्षक लूक प्राप्त होईल.- मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लोककर्म महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका