लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील ‘आऊटर’ भाग पूर्णत: टँकरवर अवलंबून असतात. मात्र टँकर बंद असल्याने या भागांमध्ये पाण्यासाठी शोध सुरू असल्याचे दिसून आले. लोक विहिरी व हॅण्डपंपातून पाणी भरत होते. ज्यांनी प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाणी भरले होते, तेथेदेखील दुपारनंतर जलशोधमोहिम दिसून आली. दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपुरात पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प झाला होता.शहरात दिवसभर पाण्याचे टँकर्स बंद होते. गुरुवारी शहरात पाणीपुरवठा समान व चांगल्या प्रमाणात व्हावा यासाठी ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाला आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत, असे जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले.चार झोनमध्ये पाणीपुरवठाप्राप्त झालेल्या माहितीनुसार कन्हान नदीत पाण्याची पातळी चांगली आहे. जर या पाण्याचा उपयोग झाला नाही तर ते वाहून जाऊ शकते. यामुळेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी सुरू होते. त्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरांतर्गत येणाऱ्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला. मात्र ही स्थिती जास्त काळ राहणार नाही. जोपर्यंत कन्हान नदीत पाणी असेल तोपर्यंत येथे पाणीपुरवठा होईल.‘ओसीडब्ल्यू’ला दोनशेहून अधिक फोनपाणीपुरवठा न झाल्यामुळे ओसीडब्ल्यूच्या टोल फ्री क्रमांकावर दिवसभर फोनची घंटी खणखणत होती. दिवसभरात एकूण २०३ फोन आले. यात १०२ फोन हे पाणीकपातीचा निर्णय खरा आहे की नाही, याची विचारणा करण्यासाठी होते. तर १०१ जणांनी पाणीपुरवठा न झाल्याची तक्रार केली.
नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:42 AM
पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.
ठळक मुद्देशहरातील ८० टक्के भाग कोरडा : कन्हान नदीमुळे पूर्व, उत्तर नागपूरवर कृपा