शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नागपुरात नायलॉन मांजाने कापला व्यापाऱ्याचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 9:58 PM

नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खाण्यापिण्यास मनाई केली आहे.

ठळक मुद्देअंगठाही कापल्या गेला : दहीबाजार पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खाण्यापिण्यास मनाई केली आहे.जखमीला ओंकारनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे नायलॉन मांजावर प्रतिबंध असला तरी त्याची विक्री सुरू आहे. प्रशासन त्याबाबत उदासीन आहे. त्यामुळे जीवघेणा ठरलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर कुठलाही परिणाम होताना दिसून येत नाही.मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना दहीबाजार उड्डाण पुलावर घडली. राजेश जयस्वाल यांचे जरीपटका रोडवर बीअर बार आहे. ते जेवणासाठी सायंकाळी ५ वाजता बाईकने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी दहीबाजार पुलावर राजेश यांना त्यांच्या गळ्यात मांजा अडकल्याचे जाणवले. तेव्हा त्यांनी हाताने मांजा हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु मांजा नायलॉनचा असल्याने त्यांचा अंगठा व गळा दोन्ही कापल्या गेला. परंतु गळ्यात रुमाल बांधून असल्याने त्यांना केवळ अंगठा कापल्याचे दिसून आले. गळा कापल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. अंगठ्याला दुसरा रुमाल लपेटून ते घरी गेले. घरी पोहोचल्यावर जेव्हा गळ्यातून रुमाल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा रक्तामुळे रुमाल गळ्यालाच चिकटला. कसाबसा रुमाल काढला तेव्हा मांजाने गळा पूर्णपणे कापल्या गेल्याचे दिसून आले. त्यांना लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हेल्मेटमुळे वाचले डोकेदही बाजार पुलावर घडलेल्या या घटनेने सर्वांनाच घाबरवले आहे. परंतु या घटनेने हेल्मेटच्या वापराचा फायदाही दिसून आला. राजेश जयस्वाल यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांचे डोके मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिले. हेल्मेट नसता तर चेहरा व डोकेही जखमी झाले असते.अपघातानंतर कुटुंबीय करताहेत आवाहनया घटनेनंतर जखमी राजेश जयस्वाल यांच्या कुटुंबीयांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नका, असे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा जीवघेणा आहे. राजेश जयस्वालचे मोठे भाऊ विजय जायस्वाल यांनीही नायलॉन मांजाचा वापर करू नका. हेल्मेट घालूनच वाहन चालवा, गळ्यात रुमाल बांधा, असे आवाहन केले आहे.नायलॉन मांजा विक्रे त्यांवर दंडात्मक कारवाई करणारमकरसंक्रांतीच्या पर्वावर शहरात सर्वत्र पतंगबाजी होते. बंदी असूनही नायलॉन मांजाचा यासाठी सर्रास वापर केला जातो. या मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात. तसेच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. अशा घटना घडू नये यासाठी नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विक्रेत्यांवर धाडी घालून मांजा जप्त केला जाणार आहे. सोबतच दंडात्मक कारवाई के ली जाणार आहे.पतंगीसाठी नायलॉन मांजा वापरण्याला बंदी असूनही या धाग्याचा सर्रास वापर केला जातो. यामुळे अनेक जण जखमी होतात. वेळप्रसंगी काहींना जीव गमवावा लागतो. याची दखल घेत आरोग्य विभागातर्फे शुक्रवारपासून शहरात मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी झोननिहाय पथक गठित करण्यात येणार आहे. यात उपद्रव शोध पथकाचे दोन जवान व आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी अशा चार जणांचे पथक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर धाडी घालून साठा जप्त करणार आहे. त्यानंतरही नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.या संदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात झोननिहाय जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी दिली. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही याला आळा बसलेला नाही. त्यामुळे विक्रेत्यासोबतच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.विशेष म्हणजे विक्रीवर बंदी असूनही गांधीबाग व सक्करदरा भागात नायलॉन मांजाची जादा दराने विक्री सुरू आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.

 

टॅग्स :kiteपतंगnagpurनागपूर