लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अद्यापही संकल्पपूर्ती झालेली नाही. देशात रामराज्य येईल तेव्हाच संकल्प पूर्ण होईल. आपल्यासाठी राम हेच राष्ट्र असून, रामाच्या नावाने देशाला ऐक्याच्या सूत्रात बांधले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल आणि हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ प्रांत निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली. पोद्दारेश्वर राममंदिरात आयोजित कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. राज्यपालांनी या निधीत १ लाख ११ हजारांचे योगदानदेखील दिले.
कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी आरतीदेखील केली व त्यानंतर मोकळ्या जागेत जमलेल्या भाविकांना संबोधित केले. विदर्भात १५ फेब्रुवारीपर्यंत निधी संकलन व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येईल. निधी संकलन पावती पुस्तक व कूपनच्या माध्यमातून केल्या जाईल, अशी माहिती प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.
शहरात ३८ मंदिरांत आयोजन
दरम्यान, नागपूरच्या विविध भागांमध्येदेखील श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाला सुरुवात झाली. मंदिराकरिता सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशाने रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यायासर्फे घरोघरी संपर्क करून निधी समर्पणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील ३८ मंदिरांमध्ये याची सुरुवात झाली. यात मोहिते, इतवारी, लालगंज, बिनाकी, सदर, गिट्टीखदान, धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, सोमलवाडा, अजनी, अयोध्यानगर, नंदनवन या भागांचा समावेश होता. विविध ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून शांताक्का, खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ.रमेश गौतम, अतुल मोघे, मोहन अग्निहोत्री, सुधीर वºहाडपांडे, अजय पत्की, श्याम पत्तरकिने.