जीवन रामावत ल्ल नागपूरवाघाला कोणतेही नाव नसते, गाव नसते. तो जंगलाचा राजा असतो आणि हीच त्याची ओळख असते. मात्र अलीकडे वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी या वाघांवर आपले नाव थोपवून प्रसिद्धी लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. हा वन्यजीवप्रेमींना नक्कीच चिड आणणारा आणि संतापजनक प्रकार आहे. अशाच नागपूर शेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘श्रीनिवास’ आणि ‘बिट्टू’ ची जोडी सध्या वन विभागात चर्चेचा विषय बनली आहे. शिवाय त्यावर प्रखर टीका सुद्धा होत आहे. काही वरिष्ठ वन अधिकारी मोफतची लोकप्रियता लाटण्यासाठी स्थानिक लोकांच्या तोंडी घालून वाघाला स्वत:ची नावे देत असल्याचा प्रताप पुढे आला आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांना नाव देण्यासंबंधी नियम आहे. त्यानुसार कोणत्याही वाघाला टी-१ किंवा टी-२ अशा प्रकारची नावे दिली जावी, असे अपेक्षित आहे. कुणी अधिकारी स्वत:चे नाव देत असेल, आणि त्याचे पुरावे जर प्राप्त झाले तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसंबंधी विचार केला जाईल. डॉ. देबाब्रता स्वाईन,महानिरीक्षक, एनटीसीएवाघांच्या नावांचा खेळ जंगल वाघाला दिलेली नावे पेंच वीरप्पन नागझिरा डेंडू, राष्ट्रपती, माईताडोबा गब्बर, मायाबोर कॅटरिना, बाजीरावउमरेड-कऱ्हांडला श्रीनिवास, बिट्टू, जय, चांदी, फेअरी (टी-६)
वाघाचे नाव अधिकाऱ्याचा डाव
By admin | Published: March 28, 2016 2:57 AM