लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येय मोठं असलं की, प्रवासही तितकाच कठीण असतो. पण त्या प्रवासात जर मनात अढळ जिद्द असेल आणि डोळ्यांत झळाळती स्वप्नं असतील, तर कुठलंच शिखर दूर राहत नाही. यूपीएससीसारखी भारतातील सर्वांत कठीण समजली जाणारी स्पर्धा परीक्षा यंदा विदर्भातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार केली आहे. त्यात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य घरातील विद्यार्थी आहेत. ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर या यशामागे असलेली अथक मेहनत, अपार संयम आणि अढळ ध्येयवेड या प्रत्येकाच्या प्रेरणादायी प्रवासाची साक्ष आहे.
निश्चित ध्येयासाठी कठोर परिश्रमाच्या सातत्याचे यश : सौरभ रमेश येवले यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी डोळ्यांपुढे नुसते लक्ष्य असून चालत नाही. ते निश्चित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाचे सातत्य असावे लागते. ही जिद्द मनात बाळगून मेहनत करणारे सौरभ येवले याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले आहे. सौरभ हा राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांचा मुलगा आहे. आई माधुरी या गृहिणी आहेत. यूपीएससी हेच माझे ध्येय होते. २०१८ साली शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर जेईई झाली. व्हीएनआयटीमध्ये चांगली शाखा मिळाली असती; मात्र ध्येय यूपीएससी असल्याने दिल्लीला गेलो दिल्ली एनआयटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. २०२३ मध्ये यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. २०२४ साली प्राथमिक परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झाल्यानंतर मैन्समध्येही यश मिळाले. असे सौरभने सांगीतले. मुलाखतीनतर १०५६ मुले यूपीएससी उत्तीर्ण झाली त्यात सौरभ यांचा ६६९ चा क्रमांक होता.
'आयपीएस' राहुल होऊ शकेल आता 'आयएएस' : राहुल रमेश आत्रामराहुल रमेश आत्राम यांनी सलग दोन वेळा यूपीएससी बैंक केली. २०२३ मध्ये 'यूपीएससी'च्या निकाल लागला त्यात राहुलला ६६३ रैंक मिळाल्याने, त्याची निवड 'आयपीएस'साठी झाली होती; पण प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय असल्याने राहुल यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि मंगळवारी लागलेल्या अंतिम निवड यादीत राहुल यांनी ४८१ रैंक मिळवल्याने 'आयएएस'साठी निवड होईल. राहुल सध्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकादमी, हैदराबाद येथे 'आयपीएस'चे प्रशिक्षण घेत आहे. मंगळवारी लागलेल्या 'यूपीएससी च्या निकालानंतर त्याने बाळगलेल्या ध्येयाची स्वप्नपूर्ती झाली. राहुलचे वडील आर. डी. आत्राम हे समाजकल्याण विभागातून सहा. आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. केंद्रीय परीक्षेसाठी कुठलीही कोचिंग लावली नाही. अभ्यासात त्याने सातत्य ठेवले, अभ्यासाची जिद्द, चिकाटी कायम ठेवली आणितो 'आयएएस'साठी पात्र ठरला
वडिलांची शेतीत मशागत, मुलीने गाठले यश : नम्रता अनिल ठाकरेवढील शेतीत राबणारे अल्पभूधारक शेतकरी. मुलीने मात्र देशातील सर्वोच्च सेरोच पद मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे ध्येय गाठण्यासाठी नागपूर गाठले आणि प्रथानांची सर्पत सुरू झाली. अखेर सातव्या प्रयत्नात हे ध्येय तिने गाठलेच. या शेतकरी कन्या आहेत नम्रता ठाकरे, अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील हातूर्ना या छोल्याशा गावातील शेतकरी अनिल ठाकरे यांची कन्या. नम्रता अमरावती सोडून पदवी अभ्यासक्रमासाठी त्या नागपूरला आल्या. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून बीएससी पदवी पूर्ण केली आणि यादरम्यान नम्रता यांनी नागपूर विद्यापीठाच्या गणित विभागातून एम.एससी. केले. युपीएससीची तयारी करताना वैकल्पिक विषय हणून राज्यशास्त्र विषय निवडला होता. त्याचा अभ्यास करताना एम.ए.ची पदवी प्राप्त करीत नेट व जीआरएफ परीक्षाही उत्तीर्ण केल्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या काळात त्यांनी खासगी कोचिंग वर्गामध्ये शिकविणे सुरू केले, जे अद्यापही सुरू आहे.
'सारथी'ची साथदिल्लीला तयारीसाठी जाण्याची आर्थिक क्षमता बडिनांची नव्हती. त्यामुळे नघता यांनी सुरुवातीला सेल्फ स्टडी सुरू केली. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' संस्थेमार्फत झालेली परीक्षा उत्तीर्ण करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आणि तयारीसाठी दिल्ली गाठली व तयारी केली. नम्रता यांचा युपीएससीमध्ये ६७१ या रैंक आहे. याप्रमाणे आयपीएस किंया आयआरएस मिळेल, असा विश्वास त्यांना आहे.