शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

नांदेडचे राष्ट्रध्वज फडकतात विदर्भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:30 PM

नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते.

ठळक मुद्देसर्टिफाईड ध्वजाने व्हावे ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची निर्मिती केली जाते. राष्ट्रध्वजाच्या संहितेनुसार नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते.गांधीसागर तलावासमोरील खादी ग्रामोद्योग भवन हे ध्वजसंहितेनुसार विक्री करणारे अधिकृत केंद्र आहे. १९६० पासून येथे ध्वजनिर्मिती केली जाते. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून ध्वजाची मागणी असते. दरवर्षी या केंद्रातून जवळपास पाच ते सात हजार ध्वजांची विक्री होते. या केंद्रावर मिळणारे ध्वज हे ध्वजसंहितेनुसार असतात. प्रत्येक ध्वजाला शासन सर्टिफाईड करून देते. संस्थेतर्फे असो अथवा शासकीय कार्यक्रमाला ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व शासकीय कार्यालये, शाळांमध्ये या केंद्रातून ध्वजांची मागणी होते.काय आहे ध्वजसंहिताध्वजारोहण सोहळ शासकीय असो की खासगी, तिथे फडकविला जाणारा ध्वज हा ध्वजसंहितेनुसारच असावा. ध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे खादीचे असावे. ध्वजात केशरी, पांढरा, हिरवा व निळा रंगाचा वापर करण्यात येतो. ध्वजाच्या रंगात कुठलीही तफावत राहता कामा नये. संहितेनुसार ठराविक आकाराचेच ध्वज असावेत. ध्वज बनविताना एक इंच आकारसुद्धा वाढता कामा नये. या संहिता पूर्ण झाल्यानंतरच ध्वजाला ‘आयएसआय’ मार्क देण्यात येतो. ध्वजारोहण कधीही करता येत नाही. संहितेनुसार सूर्योदयानंतर ध्वजारोहण करता येते, मात्र सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवावा लागतो. तसेच ध्वज खराब झाला असेल, तर त्याचा अवमान होऊ नये म्हणून ध्वजाला जाळून अथवा जमिनीत दफन करून नष्ट करावे लागते.सर्टिफाईड ध्वजाची अशा आहे किमती१८ बाय २७ इंच - ४०० रुपये२ बाय ३ फूट - ६०० रुपये३ बाय ४.५ फूट - ११८० रुपये४ बाय ६ फूट - १६८० रुपये६ बाय ९ फूट - ४३६० रुपये८ बाय १२ फूट - ५८०० रुपयेजिल्हाधिकारी कार्यालयावर ६ बाय ९ आकाराचा ध्वजध्वजसंहितेनुसार १८ बाय २७ इंच आकाराच्या ध्वजापासून ८ बाय १२ फुटापर्यंतचे सर्टिफाईड ध्वज विक्रीस आहेत. १८ बाय २७ इंचाचा ध्वज २० फूट उंचीपर्यंत फडकविता येतो. संहितेनुसार हा ध्वज घरावरसुद्धा फडकवू शकतो. शाळांमध्ये अथवा खासगी ध्वजारोहण कार्यक्रमात २ बाय ३ फुटाचा ध्वज वापरला जातो. कारगीलच्या युद्धात विजयश्री मिळविल्यानंतर टायगर हिलवर जो राष्ट्रध्वज फडकला तो ८ बाय १२ साईजचा होता. ध्वजसंहितेनुसार देशाचा अभिमान वाढविणाऱ्या घटनेप्रसंगीच सर्वात मोठ्या आकाराचा ध्वज फडकविण्यात येतो. जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात फडकविण्यात येणारा ध्वज हा ६ बाय ९ या आकाराचा असतो. इतर सरकारी कार्यालयाला कुठल्या आकाराचा ध्वज घ्यावा, याचा नियम नाही.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजNandedनांदेडVidarbhaविदर्भ