ऑनलाईन लोकमत नागपूर : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नारायण राणे हे १०० टक्के मंत्री बनतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागासोबत विविध विषयांवर संवाद साधला.मंत्रिमंडळाचा विस्तार जाणूनबुजून लांबविण्यात आलेला नाही. नारायण राणे यांच्यामुळे तर विस्तार अजिबातच लांबलेला नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कधीही विस्तार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यानंतर शिवसेनेशी संबंध ताणले जाण्याच्या शक्यतेचे त्यांनी खंडन केले. सरकारमध्ये सद्यस्थितीत या दोन्ही पक्षात कुठलेही ताणतणाव नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून दोन्ही पक्ष सोबत आहेत. त्यांचे नेते काही बोलतात, तर आम्हीदेखील त्याला उत्तर देतो. मात्र मनभेद नाहीत. शिवसेनेपासून आम्हाला काहीही धोका नाही, असे प्रतिपादन दानवे यांनी केले. रावसाहेब दानवे यांच्यासमवेत भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, ‘एमएसईबी’चे संचालक विश्वास पाठक हेदेखील उपस्थित होते. ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी दानवे यांचे स्वागत केले.वेगळ्या मराठवाड्याला पाठिंबा नाहीवेगळ्या विदर्भासह स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणीदेखील समोर येत आहे. यासंदर्भात दानवे यांना विचारणा केली असता वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीला भाजपाचा पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडा हे वेगळे राज्य करणे संयुक्तिक राहणार नाही. तेथे आवश्यक संसाधनांचा विकास होत नाही, तोपर्यंत अशा मागणीला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.संघटन मंत्रिपदासाठी माणसांचा शोधरवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे राज्य संघटनमंत्री हे पद रिक्तच आहे. संघटन मंत्रिपदासाठी पक्षाने ‘वेट अॅन्ड वॉच’चेच धोरण घेतले आहे. या पदासाठी योग्य माणसांचा आमचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपामध्ये संघटन मंत्रिपद हे महत्त्वाचे मानण्यात येते हे विशेष.‘इनकमिंग’मुळे भाजपाची वाढएक काळ होता जेव्हा भाजपाचे राज्यात चौथे स्थान होते. दुसºया स्थानावर येण्यासाठी पक्षाला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. मात्र केंद्र व राज्यात सत्ताबदल झाल्यापासून इतर पक्षातील चांगली माणसे आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करीत आहोत. या ‘इनकमिंग’मुळे भाजपाच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे व पक्ष राज्यात अव्वल झाला आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना अनेकदा इच्छा असूनही तिकीट देणे शक्य नसते. राजकीय कारणांमुळे नवीन लोकांना उमेदवारी द्यावी लागते, असेदेखील ते म्हणाले. प्रसाद लाड यांच्या विधान परिषद उमेदवारीवरून पक्षात कुठलाही असंतोष नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे शंभर टक्के मंत्री बनतील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 9:04 PM
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून नारायण राणे हे १०० टक्के मंत्री बनतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
ठळक मुद्देभाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावाहिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार‘लोकमत’ला सदिच्छा भेट