शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

राठोड मंगल कार्यालयावर नासुप्रचा हातोडा

By admin | Published: May 20, 2016 2:36 AM

बांधकामाची अनुमती न घेता हरीश राठोड यांनी मानकापूर येथील खसरा क्रमांक २३३/२४२ मध्ये दोन मजली मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले होते.

सलग ११ तास कारवाई : ६० पोलिसांचा ताफा नागपूर : बांधकामाची अनुमती न घेता हरीश राठोड यांनी मानकापूर येथील खसरा क्रमांक २३३/२४२ मध्ये दोन मजली मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले होते. वारंवार नोटीस बजावल्यानंतर बांधकाम न थांबविल्याने गुरुवारी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात पोकलँडच्या साहाय्याने ही इमारत तोडली. सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत सलग ११ तास ही कारवाई करण्यात आली. राठोड यांनी ३० बाय १३.७ मीटर जागेत दोन मजली मंगल कार्यालयाचे अवैध बांधकाम सुरू केले होते. नासुप्रचे कार्यकारी अभियंता (उत्तर)प्रमोद धनकर यांनी मंगल कार्यालयाचे अवैध बांधकाम हटविण्यासाठी १० आॅगस्ट २०१५ रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. परंतु राठोड यांनी अतिक्र मण हटविले नाही. त्यामुळे पुन्हा २५ जानेवारी २०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु राठोड यांच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी १० मे २०१६ रोजी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नासुप्रचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले होते. परंतु हरीश राठोड यांचा मुलगा साईनाथ राठोड याने पथकावर हल्ला केला होता. यात चार कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली होती. या संदर्भात मानकापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्यावेळी साईनाथ राठोड यांनी कारवाईला विरोध दर्शवून कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने गुुरुवारी अवैध बांधकाम हटविताना कोणत्याही स्वरूपाची अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन मजली मंगल कार्यालयाचा बहुतांश भाग पाडण्यात आला. सायंकाळी ७ नंतर कारवाई थांबविण्यात आली. उर्वरित अवैध बांधकाम हटविण्याची नोटीस राठोड यांना बजावण्यात आली आहे. राठोड यांनी बांधकाम न हटविल्यास नासुप्र पुन्हा कारवाई करणार असल्याची माहिती धनकर यांनी दिली. पथकात विभागीय अधिकारी एस.बी.झाडे, अनिल राठोड, सहायक अभियंता कमलेश टेंभुर्णे, स्थापत्य सहायक रामभाऊ पाटील, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख वसंतराव कन्हेरे यांच्यासह कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)