शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरात ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रा. स्व. संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2021 8:06 PM

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे.

ठळक मुद्देसर्वच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणारवर्षभरातील कामगिरीचा आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह महत्त्वाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील. (National Coordinating Meeting of the Sangh in Nagpur from 3rd to 4th September)

संघाच्या कार्यप्रणालीत बैठकांना मोठे स्थान आहे. दरवर्षी विविध पातळ्यांवर बैठका होत असतात. वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यासाठी व काही वर्तमान विषयांवर मंथनासाठी समन्वय बैठकीचे नियमितपणे आयोजन होते. या बैठकीला संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असतात. या बैठकीत वर्षभरातील कामावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. सोबतच समन्वयाच्या दृष्टीने काही नियोजनदेखील करण्यात येते. भाजपचे प्रतिनिधीदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोबतच विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विद्याभारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री उपस्थित राहतील. दरम्यान गटश: बैठकांना मंगळवारपासूनच सुरुवात झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 कोरोनामुळे संख्येला मर्यादा

कोरोनामुळे मार्च २०२०पासून नागपुरात मोठ्या बैठकीचे आयोजन झालेले नाही. नागपुरात नियोजित असलेली अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील बंगळुरू येथे घेण्यात आली. दरम्यान, दीड वर्षात सरसंघचालकांसह संघाचे विविध पदाधिकारी सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये जाऊन बैठका घेत होते. एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मोठी बैठक होते. मागील वर्षी कोरोनामुळे छोटेखानी बैठक झाली होती. यंदादेखील उपस्थितांची संख्या मर्यादित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. कोरोना नियंत्रणात आल्यावर २०२२च्या सुरुवातीला मोठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ