शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद नागपुरात

By admin | Published: January 12, 2016 3:00 AM

नागपुरात १९ वी राष्ट्रीय राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.

देशभरातील १२०० प्रतिनिधींचा सहभाग नागपूर : नागपुरात १९ वी राष्ट्रीय राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. २१ व २२ जानेवारी रोजी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे होणाऱ्या या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शिवशंकर प्रसाद यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, केंद्रीय स्तरावरील सचिव उपस्थित राहणार आहेत. यासोबतच देशपातळीवरील आयएएस अधिकारी, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, खाजगी कंपनीचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. या परिषदेस देशातील १२०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात केंद्रीय अतिरिक्त सचिव उषा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागीय आयुक्त अनुप कुमार, केंद्र शासनाचे अवर सचिव डी. के. राणा, संचालक कल्पना एस. राव, महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान संचालक मुथुकृष्णन संकरनारायण, वरिष्ठ सल्लागार माहिती व तंत्रज्ञान मनीष अनवाडिया, सहसचिव पी. करुपा सामी, नेस्कॉमचे केतन सावंत, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयावर चर्चासत्र होईल. यात शिक्षण, आरोग्य, उद्योग या क्षेत्रामध्ये ई-गव्हर्नन्सचा वापर तसेच प्रशासनात नागरिकांना उत्तम प्रकारचे साध्या सोप्या पद्धतीने ‘आॅनलाईन’ सेवा मिळण्यासाठी विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, उपायुक्त अप्पासाहेब धुळाज, मनपा उपायुक्त प्रमोद भुसारी, पोलीस उपायुक्त भारत तागडे, उपायुक्त बलकवडे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)