नागपूर : आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी दिले.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेला सुरुवात झाली आहे. यावेळी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, इराण, सिरिया या ज्या विचाराची आज सर्वाधिक आवश्यकता आहे, त्या विचाराला प्रत्यक्षात नागपूरच्या धर्तीवर उतरवण्यासाठी धर्मगुरू एकत्र आले आहे. आजचा दिवस किती सुंदर आयोजित करण्यात आला आहे आणि सर्व धर्माचार्य करवा चौथच्या दिवशी नागपूरमध्ये येऊन देशाच्या सौदार्ह, भाईचारासीठी एकत्र प्रार्थना करत आहेत. दुवा करत आहेत आणि आज या विचाराला संपूर्ण जगाला गरज आहे.
याचबरोबर, आम्ही भाग्यशाली आहोत. ज्या भारतात आम्ही जन्म घेतला, अनेकतामध्ये एकता त्या देशाची मौलिक विशेषता आहे. सर्वधर्म सद्भाभाव त्याच्या मूलमंत्रात आहे आणि माझे हे सुद्धा परम सौभाग्य आहे की, मला जैन परंपरामध्ये भगवान महावीर यांचा जो विचार मिळाला. ज्याला अनेकांत दर्शन, ज्याला स्याद्वाद दर्शन म्हणतात. या स्याद्वादचा अर्थ हाच आहे की, आम्ही आपल्या अस्तिवात्वासोबत दुसरे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आम्ही आपल्या विचारांसोबत दुसऱ्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. आम्ही आपल्या धर्माचे इमानदारीने पालन केले पाहिजे, पण दुसऱ्या धर्मांचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे. येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो, असे आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.
धर्म आणि संप्रदाय एक नाही आहे. धर्म एका लिफाफ्यात ठेवलेला फळासारखा मधूर रस आहे. साल म्हणजे त्याचे सुरक्षतेसाठी असलेला संप्रदाय आहे. वास्तवात पाहिले तर हा देश धर्मनिरपेक्ष नाही, तर पंथनिरपेक्ष आहे. मजब निरपेक्ष आहे. धर्म तर आपला आत्मा आहे, त्याच्यापासून आपण वेगळे कसे होऊ शकतो. ज्यावेळी व्यक्ती माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझा विचार सुद्धा श्रेष्ठ आहे, असे म्हणतो, त्यावेळी अडचणी येतात. ज्याठिकाणी सत्य आणि चांगले आहे, आम्ही त्याच्यासोबत आहेत आणि ज्याठिकाणी सत्य आणि चांगले नाही आहे, तिथे कोणताही धर्म असो किंवा पक्ष असो आम्ही त्यासोबत नाही आहोत, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले.
आज सकारात्मक भावनेची गरज आहे. नकारात्मकता सोडली तर हे जग सुंदर आहे. येथे उपस्थित झालेला हा शांतीदूतांचा रथ पुढे जावा. या कुंभमेळ्यातून विचारांचे झालेले मंथन जगभर पसरावे. या शांतीदूतांनी विश्व बंधूत्त्वाची ज्योत जगभरात पेटवली आहे. कोरोना काळात भारतीय जैन जीवनशैलीने मनुष्य जीवनाला तारले आहे. आयुर्वेद, योग-प्राणायाम, संयम आधारित जीवनशैली पुन्हा प्राप्त करा. बोलणे सोपे आहे आणि कृती कठीण. पण, तो कृती सुकर व्हावी, असे प्रयत्न गरजेचे आहे आणि ते प्रयत्न या परिषदेतून होत असल्याचा आनंद आचार्य डॉ. लोकेशमुनी यांनी यावेळी व्यक्त केला.