नागपूर : महागाई विरोधात नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल इंधन दरवाढ, महागाई व बेरोजगारी विरोधात आंदोलन करीत ‘जनआक्रोश सायकल रॅली’ काढण्यात आली.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधी घोषणा देत सायकल रॅली संविधान चौकात पोहचली. यावेळी पेठे म्हणाले, कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार बुडाले. अशा संकटसमयी इंधन दरवाढ केली जात आहे. वाहतूक महाग झाल्याने महागाई वाढली आहे. केंद्र सरकारचे एकूणच आर्थिक धोरण कुचकामी ठरले आहे. दरवाढीविरुद्ध हे जनआक्रोश आंदोलन असून त्वरित ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी पेठे यांनी दिला.
आंदोलनात आ. प्रकाश गजभिये, गंगाप्रसाद ग्वालबन्सी, नगरसेविका आभा पांडे, दिलीप पनकुले, जानबा मस्के, रमण ठवकर, वर्षा शामकुळे, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, रवनीश पांडेय, गुलशन मुनियार, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, शैलेश पांडे, अशोक काटले, विशाल खांडेकर, शिव भिंडे, श्रीकांत शिवणकर, मिलिंद मानापुरे, सतीश इटकेलवार, प्रकाश लिखानकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.