लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कामगारांचे बेहाल झाले. त्यांना तब्बल हजार किमी पायी चालत जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे येत्या २२ मे रोजी देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. यासंदर्भात माकपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन सादर केले.स्थलांतरित मजूर व कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बस सेवा पुरविली जावी, सर्व मजुरांना १० हजार रुपये भत्ता देण्यात यावा, मनरेगा योजनेला बळकटी देण्यात यावी, सर्वांना रेशन मिळावे, कामगार कायद्यात कोणताही बदल करू नये आदी मागण्या यावेळी करण्यात येतील. शिष्टमंडळात श्याम काळे, डॉ. युगल रायलू, अरुण वनकर, अनिल सहारे, ज्योती अंडरसहारे आदी उपस्थित होते.
माकपतर्फे शुक्रवारी देशव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:31 IST