योगेश पांडे - नागपूर
नागपूर : आगामी निवडणूकांच्या दृष्टीने संघटन मजबुतीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे नागपूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणीत ओबीसींचा वरचष्मा असून मतांचे गणित लक्षात ठेवून अनेकांना संधी देण्यात आली आहे.
संध्या गोतमारे, अनिल निधान, दिनेश ठाकरे, आदर्श पटले, रिंकेश चवरे यांच्याकडे जिल्हा महामंत्रपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिंकेशजी चवरे यांना जिल्हा महामंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. किशोर रेवतकर यांच्याकडे मुख्यालय प्रभारी पद देण्यात आले आहे. तर इमेश्वर यावलकर, उकेश चौहाण, प्रकाश टेकाडे, माया पाटील, निलिमा घाटोळे, वैशाली ठाकूर, विशाल भोसले, राजेश ठाकरे, किशोर चौधरी, दिलीप सोनटक्के यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. आपल्या पोस्टरबाजीमुळे चर्चेत असलेले व उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेले बबलु गौतम यांनादेखील उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. अजय अग्रवाल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहे. शालिनी बर्वे, गितांजली वानखेडे, सुनिल जुवार, अतुल हजारे, विनोद ठाकरे, नितीन धोटे, अभय घुगल, मोरेश्वर सोरते, दिलीप तांदळे, सुनिल कोरडे, रामराव मोवाडे यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोहळे यांनी विविध तालुका मंडळाच्या अध्यक्षांचीदेखील घोषणा केली.
प्रदेशाध्यक्षांचा मुलगा युवा मोर्चा महामंत्रीपदी
अनुराधा अमिन (जिल्हा महिला आघाडी), आशीष फुटाणे (नागपूर जिल्हा युवा मोर्चा), नरेशज मोटघरे (अनुसूचित जाती मोर्चा), हरीष कंगाली (अनुसूचित जमाती मोर्चा), राम दिवटे (ओबीसी मोर्चा), डॉ.सुरेश खोडे (किसान मोर्चा) यांच्याकडे विविध मोर्चांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याची युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.