शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

जिल्हा बँकेला नवसंजीवनी

By admin | Published: March 15, 2016 4:51 AM

केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय

नागपूर : केवळ शेतकऱ्यांना बँकेच्या विविध सवलतीचा फायदा व्हावा, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे रिझर्व्ह बँकेने नागपूरच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपला कारभार सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा सोमवारी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल करताना दोन अटी घालून दिल्या आहेत. या बँकेची कार्यकक्षा फक्त नागपूर जिल्हाच राहणार आहे. तसेच परवान्याची प्रत बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँक आपले दैनंदिन काम सुरू करू शकेल.राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना बँकेत १५० कोटींचा घोटाळा झाला होता. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाच्या काळातही घोटाळे झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केलेल्या रकमा बँकेकडे अडकल्या. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज थांबले. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले होते. शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही बँक बंद झाल्यामुळे झाले. १५ मार्चपर्यत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी नागपूरच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या बँकेचा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेतला. अनेक बैठका झाल्यानंतर शासनाने बँकेला काही निधी देण्याची तयारी दर्शविली.कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणारबँकेचे आर्थिक व्यवहार सुरू होताच आॅक्टोबरनंतर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. मार्चच्या प्रारंभीपासूनच १०० कोटी, त्यानंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँक सुरू होताच एनपीए कमी होणार आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे. याशिवाय ठेवी परतची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटींनुसारच होईल.(प्रतिनिधी)शासनाने आश्वासन पाळलेरिझर्व्ह बँकेने आता बँक चालविण्यासाठी परवाना दिल्यामुळे शेतकऱ्याच्या हक्काची बँक असलेल्या एनडीसीसी बँक पुन्हा जिवंत झाली आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाने दिलेले आश्वासन नियोजित वेळेत पाळले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.