नागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात सकाळपासूनच अवकाशात ढग गोळा झाले. किमान तापमान १.९ अंश सेल्सिअसने खालावले. ढगांमुळे तापमान घटले, आर्द्रताही बरीच घटली. सकाळी ती ३९ टक्के होती, तर सायंकाळी ३८वर आली. तापमानाचा पारा खालावला असला तरी, वातावरणातील कोरडेपण दिवसभ कायम होते. आज विदर्भात अकोलामधील तापमान सर्वाधिक म्हणजे ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
हवामान विभागाच्या अनुमानानुसार, बंगालच्या खाडीमध्ये यास चक्रीवादळ पुढे सरकत आहे. यामुळे मध्ये भारतामधील अवकाशात आर्द्रता प्रवेशली आहे. ढग दाटण्याचे कारण हेच आहे.
२८ आणि २९ मे रोजी गडगडाटांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील, असा अंदाज आहे. यावरून हे स्पष्ट दिसत आहे की, यंदाच्या नवतपामध्ये प्रचंड तापमान वाढणार नाही.