शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

तीन बड्या थकबाकीदारांमुळे नवोदय बँक अडचणीत

By admin | Published: June 17, 2017 2:21 AM

तीन बड्या समूहांनी कर्ज थकविल्यामुळे संचालकांच्या अव्यावसायिक कामकाजामुळे नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक

संचालकांची अव्यावसायिकता नडली : कशी होणार वसुली ? सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तीन बड्या समूहांनी कर्ज थकविल्यामुळे संचालकांच्या अव्यावसायिक कामकाजामुळे नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली असल्याचे उघड झाले आहे.नवोदय बँकेचे एकूण कर्ज ४७ कोटी आहे व त्यापैकी ४५ कोटींचे कर्ज थकीत (एनपीए) झाले आहे. मजेची बाब म्हणजे यापैकी तब्बल ३२.४५ कोटी कर्ज फक्त तीन उद्योग समूहांनी थकविले आहे. यामध्ये ग्लॅडस्टन इन्फ्रास्ट्रक्चर समूह- ८.३४ कोटी, मनमोहन ट्रेडिंग कंपनी- ११.२१ कोटी व जोशी कन्सलटन्सी- १२.९० कोटी या समूहांचा समावेश आहे. या तीन समूहांकडची थकबाकी वसूल झाली तर नवोदय बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ बँक बनू शकते आणि हेच आव्हान आता नव्याने आलेल्या प्रशासक सतीश भोसले यांचेसमोर आहे. याबाबतीत संपर्क केला असता ग्लॅडस्टन समूहाचे बालकिशन गांधी यांनी आमच्याकडे २ ते २.५० कोटी (८.३४ कोटी नव्हे) हे मान्य केले. आमची शांतीनिकेतन गृह प्रकल्प बेसा येथे आहे. चार वर्षांपासून राज्य सरकारने या भागातील विक्रीपत्राच्या रजिस्ट्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे आमची घरे विकली जात नाही. बंदी हटली तर आम्ही कर्जाची परतफेड करायला तयार आहोत, असे गांधी म्हणाले. मनमोहर ट्रेडिंग कंपनीचे मनमोहन हिंगल यांनीसुद्धा थकबाकी तीन ते साडेतीन कोटी आहे. (११.२१ कोटी नाही) हे मान्य केले. कर्ज थकायसाठी खूप कारणे आहेत त्याबद्दल नंतर बोलू, असे हिंगल म्हणाले. जोशी कन्सलटन्सीच्या विजय जोशींशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान अशोक धवड यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळामध्ये व्यावसायिकतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे नवोदय बँक अडचणीत आल्याची चर्चा शहरात आहे. याला दुजोरा देताना नवोदय बँकेच्या एका माजी सल्लागाराने गोपनीयतेच्या अटीवर लोकमतला सांगितले की, संचालक मंडळाने जोशी कन्सलटन्सी विरुद्ध चेक बाऊन्स झाल्याबद्दल ज्या केसेस दाखल केल्या होत्या त्या परत घेतल्या. एवढेच नव्हे तर हा समूह बँकेचे १२ कोटी थकविणारा कर्जदार असूनही त्याला ना हरकत प्रमाणपत्रही देऊन टाकले होते. या अशा मनमानी अव्यावसायिक कारभारामुळे बँक अडचणीत आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे हा सल्लागार म्हणाला. अशोक धवड यांनी हे नाकारले. आम्ही सल्लागाराच्या सूचनेवरूनच काम केले व त्यानेच चुकीचा सल्ला देऊन बँकेला अडचणीत आणले आहे, असा आरोपही धवड यांनी केला.