नवोदय अर्बन बँक आर्थिक घोटाळा : धवड दाम्पत्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 08:48 PM2019-07-23T20:48:37+5:302019-07-23T20:50:32+5:30

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. करिता दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

Navodaya Urban Bank Financial Scam: Police Have Evidence Against Dhawad Couple | नवोदय अर्बन बँक आर्थिक घोटाळा : धवड दाम्पत्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे

नवोदय अर्बन बँक आर्थिक घोटाळा : धवड दाम्पत्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे

Next
ठळक मुद्देसरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. करिता दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
अशोक धवडबँकेचे अध्यक्ष तर, किरण धवड संचालिका आहेत. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखविण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. धवड दाम्पत्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Navodaya Urban Bank Financial Scam: Police Have Evidence Against Dhawad Couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.