शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

नागपुरात राष्ट्रवादीने पेटविली निवडणुकीची फुलझडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:51 AM

दिवाळी मिलन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात निवडणुकीची फुलझडी पेटविली.

ठळक मुद्देदिवाळीच्या मिलनात दिला कामाला लागण्याचा संदेश

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दिवाळी मिलन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची फुलझडी पेटविली. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक वाढवायचे आहेत. त्यासाठी आतापासून नियोजन करा. विविध संस्था, संघटना, व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवा, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला.

राष्ट्रवादीतर्फे येथे दिवाळी मिलन सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, दिलीप पनकुले, प्रशांत पवार, ईश्वर बाळबुधे, शब्बीर विद्रोही, नूतन रेवतकर, रवी पराते, डॉ. विलास मूर्ती उपस्थित होते.अहीरकर यांनी सांगितले की, शहरातील विविध संघटनांना जोडणे सुरू आहे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे दोन वर्षांच्या कामाचा अहवाल गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.

काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी

दिवाळी मिलन सोहळा असल्यामुळे पदाधिकारी निवडणुकीवर सावरतच बोलले. मात्र, कार्यक्रमानंतर निवडणूक रणनितीवर चर्चा रंगल्या. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जागावाटपासाठी काँग्रेससोबत वाटाघाटी होते. मात्र, काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव दिला जात नाही. राष्ट्रवादीचे शहरात अस्तीत्वच नाही, अशी भाषा वापरली जाते. असेच सुरू राहिले तर स्वबळाचा विचार करायला हरकत नाही, अशा भावनाही उपस्थितांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस