शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आगामी निवडणुकात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत

By कमलेश वानखेडे | Published: July 15, 2022 5:16 PM

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.

कमलेश वानखेडे

नागपूर :  नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे.

हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण याबाबत काँग्रेस सोबत व  शिवसेने सोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर  सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरधरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावरील बंदी आणली आहे.  हे करताना देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं होतं का, असा सवाल करीत याबाबत उद्या दिल्लीत बैठक होईल आणि आमची दिशा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर

राज्यात पूरपरिस्थीत आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेले १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोलाही पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. नव्या सरकारने काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले, असे सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, राऊत हे या दोघांबरोबर काम करून आहेत, त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे. ५० पैकी एकही आमदार हरला तर राजीनामा देईन या शिंदे यांच्या वक्तव्यावर आपल्याला आता काहीही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.

सत्तेचा गैरवापर टीकत नाही, श्रीलंकेने दाखवून दिले

श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली होती. सत्तेचा पाहिजे तसा वापर केला जात होता. आज लोक राष्ट्रपतींच्या घरात घुसुन संघर्ष करीत आहेत. लाखो लोक रस्त्यावर आहेत. सत्तेचा गैरवापर हा फार काळ टीकत नसतो, हे श्रीलंकेने दाखवून दिले आहे, असे सांगत पवार यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना एकसंघ राहून शक्तिशाली संघटन उभारण्याचे आवाहन कार्यकारिणीच्या बैठकीत केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस