शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भाजपाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भाजपाविरोधात निदर्शने करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भाजपाविरोधात निदर्शने करण्यात आली. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी. तसेच पुस्तक लिहिणारे भाजप पदाधिकारी भगवान गोयल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नूतन रेवतकर, महेंद्र भांगे, सुरेश करने, अनिल बोकडे, अमोल पारपल्लीवार, सरवर अन्सारी, नीरज तवानी, तौसिफ शेख, राजेश मासूरकर, विक्रम परिहार, आशीष वर्मा, शुभम टेकाडे, चंद्रकांत नाईक, रवी यादव, रिजवान अन्सारी, नितीन वजेकर, चेतन सदन, विलास मालके, संदीप मेंढे, शिव भेंडे, रमेश काळे, प्रवीण देवीकर,याकूब खान, नंदकिशोर नंदनवार, सय्यद शाहबाज, शाहरुख सय्यद, रवी मारशेट्टीवार, राहुल, डोंगरे, अश्विन पक्खीडे, जावेद खान, इस्माईल अन्सारी, रिजवान मन्सूरी, शाकीर पठाण, विशाल खरे, हेमंत डोरले, गौरव पवार, अनिल अकोटकर, मोहित नामदेव प्रामुख्याने उपस्थित होते.शिवसेनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणाऱ्या पुस्तकाविरु द्ध शिवसेनेनेसुद्धा निदर्शने केली. शिवसेनेसोबतच युवा सेना व वाहतूक सेनाचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असून, हा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आले. आंदोलनात माजी नगरसेवक गणेश डोईफोडे व जगतराम सिन्हा, युवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश पांडे, वाहतूक सेनाचे गौरव गुप्ता यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात संदीप पटेल, धीरज फंदी, अक्षय मेश्राम, सलमान खान, नीलेश तिघरे, महेंद्र कठाणे, श्याम तेलंग, आशिष बोकडे, रूपेश बागडे, रतन मेश्राम, अंकित शाहू आदींचा समावेश होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा