शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भेसळीच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By admin | Published: November 01, 2015 3:19 AM

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत शहरात मिठाई व इतर गोड पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे.

अन्न व औषध विभागाच्या सहआयुक्तांना घेराव : सणासुदीच्या काळात पदार्थातील भेसळ रोखावीनागपूर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी लवकरच येत आहे. अशा परिस्थितीत शहरात मिठाई व इतर गोड पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे. भेसळयुक्त खवा व दूधाचे साठे वाढले आहेत. या भेसळीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांना घेराव घोलण्यात आला. यावेळी त्यांना शहरात विविध पदार्थांमध्ये सुरू असलेल्या भेसळीबाबत अवगत करून सणासुदीच्या काळात हा प्रकार प्रकर्षाने रोखण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजय पाटील व शहर महासचिव राजेश कुंभलकर यांच्या नेतृत्वात हा घेराव घालण्यात आला. मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातूनही शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पदार्थ येत आहेत, याकडे लक्ष वेधत ते रोखण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औषध फार्मसींची तपासणी करण्यात यावी, विना परवानाधारक हॉटेल व दुकानांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी देसाई यांनी तपासणी व कारवाई करण्याचे काम सुरूअसल्याचे सांगत सणासुदीनिमित्त कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नगरसेवक कामिल अन्सारी, नगरसेविका प्रगती पाटील, कल्पना मानकर, नंदा चौधरी, हरविंदरसिंग मुल्ला, रवी गाडगे, मुन्ना तिवारी, सुनील राऊत, तनुज चौबे, प्रतिभा वासनिक, धनंजय देशमुख, चेतन राजकारणे, कादीर शेख, पराग नागपुरे, योगेश मसराम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)मेडिकलची रक्तपेढी सुरू करा याप्रसंगी मेडिकलच्या रक्तपेढीबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मेडिकलची रक्तपेढी ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी लाभदायक आहे. रक्तपेढीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे निर्देश द्या, परंतु रक्तपेढी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.