नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत गुरुवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करीत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
यावेळी महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, वर्षा शामकुळे, सेवादलाचे अध्यक्ष जानबा मस्के, युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, प्रवक्ते श्रीकांत शिवणकर, रमण ठवकर, विशाल खांडेकर, शिव बेंडे, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, महेंद्र भांगे, अमोल पारपल्लीवार,रविनिश पांडे, गुलशन मुनियार, रुद्र धाकडे, वसीम शेख लाला, जुबेर कबीर, स्वाती कुंभलकर, योगेश न्यायखोर, जावेद खान, शैलेश पांडे, सय्यद रियाज, कपिल सराफ, अश्विन सराफ, संतोष सिंह, पुरुषोत्तम वाडीघरे, तन्हा नागपुरी, अनिल बोकडे, प्रणय जांभूळकर आदी उपस्थित होते.