लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कुठल्याही प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत जवळपास सर्वच राज्यात भाजपला व त्याच्या घटक पक्षांना फटका बसत आहे. एकूणच एनडीए देशात २०० च्या पुढे जाणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ‘डाटा एनालिटिक्स डिपार्टमेंट’चे अध्यक्ष व शक्ती अॅपचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी केला.प्रवीण चक्रवर्ती व खा. कुमार केतकर यांनी रविवारी ‘लोकमत’ला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. चक्रवर्ती म्हणाले, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या चार राज्यात एनडीएला ६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. उत्तर प्रदेशातही गेल्या वेळच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी जागा मिळतील. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू यासह संपूर्ण दक्षिण भारतात एनडीएला १० जागाही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही एवढी मोठी तूट भरून काढण्यासाठी भाजपला दुसरी जागा नाही. याचा फटका निश्चितच एनडीएला बसेल, असा दावा त्यांनी केला.देशाचे एकूणच वातावरण पाहता दलित, मुस्लीम, अल्पसंख्याक समाज एकत्र येत आहेत. मतदार उघडपणे प्रतिक्रिया देणे टाळत आहे. मतदारांचे हे मौन बरेच सूचक असून ते निकाल पलटवूनच तुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रियंका फॅक्टरचा फायदाकाँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची एन्ट्री काँग्रेसला नवचैतन्य देणारी आहे. त्यांच्या प्रचाराचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला नक्कीच फायदा होईल. जागा किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. मात्र, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी नक्कीच वाढलेली असेल, असा दावाही चक्रावर्ती यांनी केला.शक्ती अॅप उपयोगीइच्छुक उमेदवार, नेते हे शक्ती अॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील काँग्रेस समर्थकांची नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तेवढ्या लोकांशी काँग्रेसचा थेट संपर्क होत आहे. काँग्रेसची ध्येयधोरणे पोहचत आहे. उमेदवारी ठरवितानाही शक्ती अॅपवरील फिडबॅकचा बऱ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जात आहे. जेथे उमेदवारीवरून मतभेद असेल अशा जागांवर तर नक्कीच हे अॅप उपयोगी ठरत आहे, असेही चक्रावर्ती यांनी स्पष्ट केले.
एनडीए २०० च्या पुढे जाणार नाही : प्रवीण चक्रवर्ती यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 8:49 PM
देशात कुठल्याही प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत जवळपास सर्वच राज्यात भाजपला व त्याच्या घटक पक्षांना फटका बसत आहे. एकूणच एनडीए देशात २०० च्या पुढे जाणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ‘डाटा एनालिटिक्स डिपार्टमेंट’चे अध्यक्ष व शक्ती अॅपचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी केला.
ठळक मुद्देदक्षिण भारतात भाजप साफ