NDA फुटणार, पाच पक्ष इंडियात येणार, कॉंग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांचा दावा

By आनंद डेकाटे | Published: August 27, 2023 06:20 PM2023-08-27T18:20:46+5:302023-08-27T18:21:44+5:30

४५० जागांवर वन टू वन फाईट

NDA will split, five parties will come, Congress spokesperson Alok Sharma claims | NDA फुटणार, पाच पक्ष इंडियात येणार, कॉंग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांचा दावा

NDA फुटणार, पाच पक्ष इंडियात येणार, कॉंग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांचा दावा

googlenewsNext

नागपूर : इंडिया' तयार होताच, 'वन मॅन' शो असलेली एनडीएची आघाडी खळबळून जागी झाली आहे. परंतु इंडियाच्या मुबंई बैठकीपूर्वी एनडीएत फुट पडणार आहेत. एनडीएत असलेले ४ ते ५ पक्ष संपर्कात असून ते इंडियात सहभागी होणार आहेत, असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केला.

शर्मा म्हणाले, '. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भ्रष्टाचार वाढला आहे. आता तर 'कॅंग' चा अहवाल आला आहे. ७ प्रकल्पाबाबत ताशेरे ओढले आहेत. आता ईडी, सीबीआयची चौकशी बसवा, असे आव्हान देताना मोदी सरकारच्या दुहेरी धोरणामुळे आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या एकांवरही दोषसिद्धता झाली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केवळ 'इव्हेंन्ट' करून देशाला भ्रमित केले जात आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे फाईलबंद का, ब्रुजभूषण यांच्यामुळे कुस्तीगीरांवर झालेला अन्याय व जागतिक संघटनेकडून कुस्तीगीर संघटनेवर केलेली निलंबनाची कारवाई झाली. भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात मुंबईच्या बैठकीनंतर कॉंग्रेस संसद ते रस्त्यांवरची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०२४ मध्ये एनडीए विरुद्ध इंडिया अशी थेट लढत होईल. तब्बल ४५० जगांवर वन टू वन फाईट होईल. इंडिया जिंकेल. अमेठीत कॉंग्रेसचा ब्लॉक अध्यक्षही उभा राहिला तर स्मृती इराणी यांची जमानत जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेत शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

शरद पवार इंडियाचे मार्गदर्शक
'इंडिया'त नेतृत्वाचा प्रश्न नाही. अहंकारी सरकारला खाली खेचणे महत्वाचे आहे. नेतृत्व कुणीही करू शकतो. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांचे मार्गदर्शन इंडियाला मिळत असून ते इंडियात महत्वाच्या भूमिकेत असल्याचे शर्मा म्हणाले. महाराष्ट्र व बिहारमध्ये चमत्कार घडेल म्हणूनच फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. राज्यात ४० पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळेल असा दावाही त्यांनी केला.

तिसऱ्या आघाडीला भाजपचे पाठबळ
तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यावेळी सुद्धा होऊ शकतो. परंतु अशा आघाडीला भाजपचे पाठबळ राहिले आहे. यावेळीही प्रयोग होऊ शकतो. मतविभाजनासाठी असा फ्रंट देशाला धोका देत आहे. नागरिकांना आता सर्व समजले आहे. मायावती व ओवैसी यांच्याबद्दल कायम संभ्रम असतो. तर, आप इंडियाचा घटक आहे. मात्र, जनविरोधी वा भ्रष्टाचाराची बाब पुढे आल्यास विरोध करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असे असे शर्मा यांनी स्पष्ट केले. वंचितचे प्रकाश आंबेडकर हे इंडियात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओपीनीअन पोल बनावट, जागेवर बसून सर्वेक्षण
२०१४ पुवीं दहा निवडणूकपुर्व सवेंक्षण झाले. त्यानंतर प्रत्येक महिन्यात एक असे एकूण शंभरावर ओपीनीअन पोल झाले आहेत. २०० सॅम्पलमधून १४० कोटी जनतेचे मत मांडले जाते. हे सर्व बनावट आहे. हरीयाणात कॉंग्रेसला दोन जागा मिळतील असे सी वोटरने म्हटले होते. कॉंग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीतील नोएडात बसून काही जण अशाप्रकारचे सवेंक्षण करीत असतात. निवडणूक आयोगाने अशा सवेंक्षणावर लक्ष घालावे अशी विनंतीही शर्मा यांनी केली.

Web Title: NDA will split, five parties will come, Congress spokesperson Alok Sharma claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.