लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भातील आज एक पत्रक जारी करत या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.नागपूर शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमधील खाटांच्या उपलब्धतेबाबतही प्रशासनाने संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर यासाठी संपर्क साधता येणार आहे. महानगरपालिकेनेदेखील रुग्णवाहिका, शववाहिका या संदर्भात प्रत्येक झोनसाठी दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर (२२४५०५३), धरमपेठ (२५६७०५६), हनुमाननगर (२७५५५८९), धंतोली (२४६५५९९), नेहरूनगर (२७०२१२६), गांधीबाग (२७३९८३२), सतरंजीपुरा (७०३०५७७६५०), लकडगंज (२७३७५९९), आशीनगर (२६५५६०५), मंगळवारी (२५९९९०५) या झोनमधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, गरजेनुसार घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क बांधून, शारीरिक अंतर ठेवून जागरूक असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोना बाधितांसाठी अॅम्ब्युलन्स हवी...डायल करा १०२ किंवा १०८ क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:54 AM
कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देमहानगरपालिकेचेही झोननिहाय नंबर जारी