शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

हुडकेश्वरच्या विकासाला हवी गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:29 AM

नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देमूलभूत सुविधांचा अभाव : समस्यांमुळे नागरिक त्रस्त; १२५ कोटींचा निधी दिल्यानंतरही कामे संथच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. परंतु मूलभूत समस्यांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पारडी, पुनापूर, वाठोडा आदी भागातही समस्यांचा डोंगर आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हुडकेश्वर-नरसाळा भागातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने १२५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. यात पाण्याची पाईप लाईन व जलकुंभ, स्मशानभूमी, गडर लाईन पावसाळी नाल्या आदी कामांचा समावेश आहे. परंतु विकास कामांची गती संथ आहे. तसेच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.हुडके श्वर येथील मुख्य रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा करण्यात आला. परंतु कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी सिमेंट रोडच्या कामाची त्रयस्तामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, यासाठी प्रभाग २९ मधील नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज होती.प्रभागातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. परंतु सहा महिन्यांत महापालिका सभागृहात एकदाही या भागातील समस्या मांडलेल्या नाही. हुडकेश्वर- नरसाळा परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परंतु कामाला गती नाही. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. गडर लाईनची कामे सुरू आहे. परंतु कामाला गती नाही. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच पावसाळी नाल्यांचा अभाव आहे. असे असूनही निवडणुकीनंतर सुविधा नसलेल्या वस्त्यात नगरसेवकांचे दर्शन झाले नसल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.टँकरद्वारे पाणीपुरवठाशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु पाईप लाईन टाकण्याचे काम संथ आहे. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यात पाईप लाईन टाकण्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी विकासाची ग्वाही दिली होती. परंतु आता त्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.डासांमुळे नागरिक त्रस्तप्रभाग २९ मध्य मोठ्या प्रमाणात रिकामे प्लाट आहेत. पावसाळ्यात या प्लाटमध्ये पाणी साचले होते. अजूनही काही ठिकाणी डबक ी साचली आहेत. त्यातच कचरा साचला असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने डास नियंत्रणासाठी तातडीने उपायोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.उद्यानांचा अभावहुडकेश्वर-नरसाळा भागातील लोकसंग्या ५० हजाराहून अधिक आहे. परंतु या परिसरात एकही उद्यान नाही. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, स्मशान भूमीचे बांधकाम, गडर लाईन, पावसाळी नाल्या, पथदिवे, शाळा, उद्यान अशा स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही दिली होती. परंतु निवडून आल्यानंतर नगरसेवकांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.नदीला संरक्षण भिंत नाहीहुडकेश्वर-नरसाळा भागातून पोरा नदी वाहते. नदीलगत नागरिकांनी घरे उभारलेली आहेत. परंतु नदीला संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात पुराचे पाणी वस्त्यांत शिरण्याचा धोका असतो. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेने संरक्षण भिंत उभारावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सभागृहात सभापती गप्पचहुडकेश्वर - नरसाळा भागातील विकास कामांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे. परंतु विकास कामे करण्याची महापालिकेचीही जबाबदारी आहे. या संदर्भात प्रभागातील नगरसेवक व झोनचे सभापती भगवान मेंढे यांनी सभागृहात प्रश्न मांडणे अपेक्षित होते. मात्र गेल्या सहा महिन्यात मेंढे सभागृहात एकदाही बोललेले नाही.