शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरणावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकच जर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 1:09 PM

नागपूर विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण; शैक्षणिक वर्तुळात खळबळ

नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसुली प्रकरण समोर आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. इतकं घाबरून जाण्यासारखं त्या प्राध्यापकाने असं काय केलं की विभागप्रमुखांना पैसे द्यावे लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कर नाही त्याला डर कशाला, ज्या माणसाने काही केलच नसेल तर घाबरण्याचे कारण काय. त्या उच्चपदस्थ विभागप्रमुखांपैकी एकहीजण पोलीस, भरोसा सेल, महिलांच्या संस्था किंवा राज्य महिला आयोगाकडे का नाही गेले?आपण काहीही केलेलं नाही, आमची फसवणूक होत असल्याबाबत त्यांनी आपली बाजू का नाही मांडली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षण क्षेत्रात जर असे प्रकार घडत असतील, प्राध्यापकच जर असे करायला लागले तर ते अजिबात योग्य नाहीये, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

महिलांच्या संदर्भात प्रत्येक विद्यापीठात  विशाखा समिती असण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. या समित्या अधिक कार्यशील असायला हव्यात, त्यात सक्षम लोकं असायला हवीत. तसेच, त्यावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, की जे नेमले जात नाहीत. त्यामुळे गुन्हा जरी घडला तरी, त्याची दखल घेऊन जे अहवाल येऊन जी कारवाई व्हायला पाहिजे तेवढी कारवाई झालेली दिसत नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

या प्रकरणात नक्की काय तपास झाला आहे, कोण जबाबदार आहे, काय प्रकराच्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत याबाबत चौकशी केली जाईल. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला पत्र देऊन लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना बोलावून आढावा आणि अहवाल मागणार, असल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

अखेर धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला

दरम्यान, लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लाखो रुपयांची खंडणी वसुलीचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर विद्यापीठाने अखेर खंडणी वसुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार काढून घेतला. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश बजावले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठExtortionखंडणीProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठ