शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा

By admin | Published: May 02, 2017 1:36 AM

गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना समोर ठेवून उन्हाळ्यातही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढ्यांना रक्ताची विशेष चणचण जाणवली नाही.

रक्तपेढ्यांमध्येही मिळेना : शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांचे रक्तदानाचे आवाहननागपूर : गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना समोर ठेवून उन्हाळ्यातही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढ्यांना रक्ताची विशेष चणचण जाणवली नाही. परंतु यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये काही काळ पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. यातही ‘निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताचा ठणठणाट असल्याचे समोर आले आहे. उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच ठिकाणी जेमतेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. काही रक्तपेढ्या ‘निगेटिव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. इतर ग्रुपमध्ये ‘एबी’, ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे. रक्ताच्या तुटवड्याला घेऊन शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)मागणी हजाराची पुरवठा २००-३०० रक्त पिशव्यांचाशहरात दिवसाकाठी साधारण एक हजार रक्त पिशव्यांची मागणी असते. परंतु सध्याच्या दिवसात २००-३०० रक्त पिशव्यांचा पुरवठा होत आहे. रक्त दिलेले सर्वच रुग्ण ‘रिप्लेसमेंट’ रक्त देतील असे नाही. उन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदातेदेखील बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ्यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल, अशाप्रकारचे गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका रक्तपेढ्यांना व रुग्णांना बसत आहे.