शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

नागपुरातील आमदार निवासात निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 9:39 PM

आमदार निवास येथील निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका असल्याची शंका वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देक्वॉरंटाईन सेंटरकडे विशेष लक्ष देण्याची गरजरुग्ण एकमेकांच्या खोलीत बसतात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अगोदर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. यासाठी शहरात विविध क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आली आहेत. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यांनाच रुग्णालयात भरतीसाठी पाठवले जाते. ही प्रक्रिया अतिशय चांगली असली तरी योग्य काळजी घेतली गेली नाही तर संसर्ग होण्याची शक्यता बळावते. आमदार निवास येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील निगेटिव्ह रुग्णही पॉझिटिव्ह होण्याचा धोका असल्याची शंका वर्तविली जात आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यातच क्वारंटाईन सेंटरचाही समावेश आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच अगोदर क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. शहरात असे अनेक सेंटर आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे क्वॉरंटाईन सेंटर म्हणजे आमदार निवास होय. आमदार निवासाची इमारत ही क्वारंटाईन सेंटरसाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येकाला स्वतंत्र व विस्तीर्ण खोली आहे. खोलीमध्येच बाथरूम व शौचालयाची व्यवस्था आहे. प्रत्येक खोलीला गॅलरी आहे. त्यामुळे व्यक्ती एकटा असेल तरी तो खोलीतच फिरू शकतो, अशी व्यवस्था आहे. परंतु क्वारंटाईन असलेला व्यक्ती हा कोरोना संशयित आहे, ही बाबही विसरून चालणार नाही. त्यामुळे ही पायाभूत व्यवस्था चांगली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यायची त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ येथे आणलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केलेले आहे म्हणजेच त्यांना इतरांपासून स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. १४ दिवस कुणासोबतच संपर्क येऊ द्यायचा नाही. परंतु येथील काही संशयित एकमेकांच्या खोलीत सर्रासपणे जातात. चर्चा करत बसतात. जेवण करतात. काही लोकांना त्यांच्या घरून जेवण उपलब्ध करून दिले जाते. जेवण वाचल्यावर तो डबा परत घरी जातो. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर १४ दिवसांनंतर ज्या रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले त्याला मेयो-मेडिकलमध्ये पाठवले जाते. त्यानंतर ती खोली (सॅनिटाईझ) निर्जंतुकीकरण न करताच दुसऱ्याला अलॉट केली जात असल्याचेही प्रकार होत असल्याचे सांगितले जाते.आमदार निवास हे कोरोना क्वारंटाईन सेंटरमधील सर्वात महत्वाचे केंद्र आहे. येथे असे प्रकार होत असतील तर निश्चितच आमदार निवासात येणारा निगेटिव्ह व्यक्तीही पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना पत्र पाठवून आमदार निवास क्वारंटाईन सेंटरमधील समस्यांकडे लक्ष वेधले असून यावर उपाय योजण्याची विनंती केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस