लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 20:46 IST
पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली. नाल्यात भंडारा रोडपर्यंत शोध घेतला. तसेच नागनदी व पिवळी नदीच्या संगमापर्यंत दोन बोटींच्या साहाय्याने शोध घेतला; मात्र नेहलचा शोध लागला नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही
ठळक मुद्देरविवारी नाल्यात वाहून गेला : दोन बोटीच्या साहाय्याने नाग व पिवळी नदीतही शोधमोहीम