लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल दोन महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महापालिकेला लवकरच पूर्णवेळ असलेले नवीन आयुक्त मिळणार आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही माहिती दिली.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची मुंबईला बदली झाली. त्यांच्याजागी मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा अनेक दिवस मुदगल यांनीच मनपा आयुक्तांचे प्रभारीपद सांभाळले. नंतर वीरेंद्र सिंह यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी येताच मनपाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. खर्चाला मर्यादा घातल्या. यावरून पदाधिकाºयांसोबत त्यांचा वाद झाला. तेव्हापासून ते शहरात राहण्यास फारसे उत्सुक नसल्याचे जाणवले. दरम्यान आईची प्रकृती खालावल्याने ते सुटीवर गेले. यातच आईचे निधन झाले. सलग दोन महिने ते सुटीवर होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त असलेले रवींद्र ठाकरे यांच्याकडे मनपा आयुक्तांचा प्रभार आहे. नुकतेच वीरेंद्र सिंह नागपूरला आले होते. ते रुजू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेच नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाबाबत बरीच चर्चा सुरु होती.शनिवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर आयोजित अनौपचारिक चर्चेत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा नागपूर मनपाला लवकरच नवीन आयुक्त देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.अश्विन मुदगल यांच्याकडे नासुप्र व एनएमआरडीचीही जबाबदारीजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे सध्या नागपूर सुधार प्रन्यास आणि एनएमआरडीचाही अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे या विभागालाही पूर्णवेळ अधिकारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
नागपूर मनपाला लवकरच मिळणार नवीन आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:03 AM
तब्बल दोन महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महापालिकेला लवकरच पूर्णवेळ असलेले नवीन आयुक्त मिळणार आहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही माहिती दिली.
ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती