लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : भारतीय स्टेट बॅंकेच्या जलालखेडा (ता. नरखेड) शाखेचे बुधवार (दि. २३)पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ५ काेटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केल्याची माहिती बॅंक व्यवस्थापनाने दिली. यात ८५ शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात आले असून, ३५६ शेतकऱ्यांच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यात आले आहे.
नव्याने कर्जदार झालेल्या ८५ शेतकऱ्यांना १ काेटी ८५ लाख रुपयांचे तर जुन्या कर्जदार ३५६ शेतकऱ्यांना ३ काेटी ८५ लाख रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला, त्यातील पात्र शेतकऱ्यांना एक आठवड्याच्या आत कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती बॅंक शाखा व्यवस्थापक मनीष गाैरखेडे यांनी दिली. कर्जाचे नुतनीकरण त्याच दिवशी करण्यात आल्याचे मनीष गाैरखेडे यांनी स्पष्ट केले. वेळीच कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
...
प्राेत्साहन निधीची प्रतीक्षा
राज्य शासनाने नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्राेत्साहन निधी जमा करण्याची घाेषणा केली हाेती. भारतीय स्टेट बॅंकेच्या जलालखेडा शाखेत अनेक कर्जदार शेतकरी पीक कर्जाचा नियमित भरणा करतात. मात्र, यातील कुणालाही या ५० हजार प्राेत्साहन निधी याेजनेचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
...
भारतीय स्टेट बॅंकेने माझे पीक कर्ज एका दिवसात नुतनीकरण करून दिले. नव्याने दिलेल्या कर्जात केवळ चार हजार रुपयांची वाढ केली. कमी पैशात शेती करणे अवघड झाले आहे.
- कुंदा ठाेंबरे, शेतकरी,
मुक्तापूर पेठ, ता. नरखेड.
...
पीक कर्ज वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज आठवडाभरात तर नुतनीकरण एका दिवसात करून कर्ज दिले जात आहे. सध्या आमच्याकडे एकाही शेतकऱ्याचा अर्ज शिल्लक नाही. आम्ही आजवर ५ काेटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे.
- मनीष गाैरखेडे, शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बॅंक, जलालखेडा.
===Photopath===
240621\img_20210624_132354.jpg
===Caption===
फोटो ओळी :- जलालखेडा येथील भारतीय स्टेट बँक.