लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोन मधील प्रभाग क्रमांक ७ मधील न्यू इंदोरा व नेहरू नगर झोन मधील प्रभाग २६ मधील गोपालकृष्ण नगर, वाठोडा तसेच सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग २० मधील तांडापेठ या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.गोपालकृष्ण नगर, वाठोडा प्रतिबंधित क्षेत्रपश्चिमेस-केशव ठाकरे यांचे घरउत्तर पूर्वेस -शितला माता मंदिरदक्षिण पश्चिमेस -प्लॉट नं.१३५, मुरलीधर निमजे यांचे घरदक्षिण पूर्वेस - मोरेश्वर कळसे यांचे घरउत्तर पश्चिमेस - गणपतराव येरणे यांचे घरन्यू इंदोरा प्रतिबंधित क्षेत्रदक्षिणेस -अमोल चंद्रिकापुरे यांचे घरदक्षिण पूर्वेस -ताराबाई गेडाम यांचे घरउत्तर पूर्वेस -नमो बुध्द विहारउत्तरेस -सुनील भिमटे यांचे घरउत्तर पश्चिमेस -संकल्प बुध्द विहारपश्चिमेस -मुरली ट्युशन क्लासेसदक्षिण पश्चिमेस -विजय पाटील यांचे घरतांडापेठ प्रतिबंधित क्षेत्रदक्षिण पश्चिमेस-केशवराव पौनीकर यांचे घरदक्षिण पूर्वेस -बापू बन्सोड चौकउत्तर पूर्वेस -धनराज सायकल स्टोअर्सउत्तरेस- गणेश नंदनवार यांचे घरउत्तर पश्चिमेस -हनुमान मंदिर
नागपुरातील न्यू इंदोरा, गोपालकृष्णनगर वाठोडा व तांडापेठ परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 8:18 PM