लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने १६ सप्टेंबरला औद्योगिक धोरण-२०१९ आणि प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. या धोरणामुळे विविध उद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीला बळ मिळणार असल्याची माहिती डब्ल्यूआयआरसी-आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जुल्फेश शाह यांनी येथे दिली.आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे ‘महाराष्ट्र औद्योगिक धोरण-२०१९ आणि प्रोत्साहन पॅकेज योजने’वर धंतोली येथील सभागृहात आयोजित चर्चासत्रात सीएंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, उपाध्यक्ष किरीट कल्याणी, सचिव सीए साकेत बागडिया, कोषाध्यक्ष जितेन सागलानी, सीए आशिष रंगवानी, शाखेचे माजी अध्यक्ष ओ.एस. बागडिया व सीए सतीश सारडा आणि सीए भागवत ठाकरे उपस्थित होते.शाह म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणामुळे उच्च तंत्रज्ञानाने विकसित होणारे क्षेत्र आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. शासनाच्या अधिसूचनेत इलेक्ट्रिक वाहन, एअरोस्पेस व डिफेन्स निर्मिती इंडस्ट्री, टेक्सटाईल मशिनरी उत्पादन, बायो टेक्नॉलॉजी व चिकित्सा, कृषी व खाद्य प्रक्रिया, लॉजिस्टिक्स व वेअरहाऊस, ग्रीन एनर्जी, बायो इंधन उत्पादन, स्पोर्ट्स व जीम उत्पादने, परमाणु ऊर्जा संयंत्र उपकरणे निर्मिती आदींसह अन्य उद्योगांचा समावेश केला आहे. शाह म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसेच विशेषत: एमएसएमई क्षेत्राशी संबंधित नवीन योजनांतर्गत अनेक तरतुदींचा समावेश केला आहे. त्याचा फायदा उद्योगांना होणार आहे.सीए भागवत ठाकरे यांनी भांडवली गुंतवणूक आणि रोजगाराच्या आधारावरील प्रकल्पाची माहिती दिली. यासह त्यांनी पीएसआय-२०१३ आणि पीएसआय-२०१९ मधील योजनांचे तुलनात्मक विश्लेषण केले. नवीन योजनेचा उद्योजकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.दोन्ही वक्त्यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि औद्योगिक विकासासाठी योजनेचा प्रचार करण्याचे आवाहन केले.सीए सुरेन दुरगकर म्हणाले, सदस्यांना अद्ययावत करण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण आहे. औद्योगिक धोरण आणि शासनाची प्रोत्साहन योजना उद्योगांना फायद्याची ठरणार आहे. चर्चासत्रात १३० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी सीए जुल्फेश शाह, सीए भागवत ठाकरे, सीए सुरेन दुरगकर, सीए साकेत बागडिया, सीए ओ.एस. बागडिया, सीए किरीट कल्याणी, सीए सतीश सारडा आणि सीए जितेन सागलानी.