शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘पेंट मार्कर’ चित्रकारांसाठी नवे माध्यम

By admin | Published: August 03, 2014 1:00 AM

रंग, ब्रश पाहिले की अनेकांचे हात शिवशिवतात. जोवर दोन-चार फटकारे कॅनव्हासवर मारत नाही, तोवर समाधान होत नाही. आता तीच अनुभूती ‘पेंट मार्कर’मधून मिळत आहे. चित्रकारांच्या रंग आणि

नागपूर : रंग, ब्रश पाहिले की अनेकांचे हात शिवशिवतात. जोवर दोन-चार फटकारे कॅनव्हासवर मारत नाही, तोवर समाधान होत नाही. आता तीच अनुभूती ‘पेंट मार्कर’मधून मिळत आहे. चित्रकारांच्या रंग आणि कुंचल्यांच्या विविध आयुधात आता पेंट मार्करचाही समावेश झाला आहे. चित्रकाराला आपल्या भावना आणखी प्रांजळपणे मांडण्याला याची मदतच होणार आहे, असे मत जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व सोनी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी मांडले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके, प्रा. गुणवंत देवघरे, सोनी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकाश सोनी व सेल्स आणि मार्केटिंगचे संचालक डॉ. एस.जी. ठोंबरे उपस्थित होते. डॉ. ठोंबरे म्हणाले, पूर्वी छन्नी, हातोडी हे कुंचले तर दगड हा कॅन्व्हॉस असायचा. नंतरच्या काळात बराच बदल होऊन ट्युबमध्ये रंग येऊ लागले. आता त्याही पुढे जाऊन ‘पेंट मार्कर’ आले आहे. ‘अ‍ॅक्रेलिक’ आणि ‘अल्कोहल’ या दोन प्रकारात उपलब्ध पेंट मार्करमुळे चित्र आणखी आकर्षक करणे सोपे झाले आहे. वॉटर कलर, आॅईल कलर, अ‍ॅक्रेलिक कलरमध्ये आता या नवीन माध्यमाचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे पेंट मार्करमुळे चित्र कमी वेळात काढणे शक्य झाले आहे. सध्या ४० रंगात असलेले हे पेंट मार्कर भविष्यात आणखी विविध रंगात उपलब्ध होणार आहे. व्यावसायिक चित्रकारही याला चांगली पसंती देत आहे. यावेळी प्रा. रामटेके आणि डॉ. देवघरे यांनीही आपले विचार मांडले. संचालन व आभार जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक मिलिंद लिंबेकर यांनी मानले. शासकीय चित्रकला महाविद्यालयात हीच कार्यशाळा ३० जुलै रोजी घेण्यात आली होती. यात ४००हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांची चित्रे आणि शनिवारी कार्यशाळेत सहभागी झालेल्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. प्रदर्शनातील चित्रनिर्मिती सर्वांना परिचित असणाऱ्या विषयाची असल्याने अनुभवलेल्या अनेक रंगछटा चित्रात दिसून येत होत्या. (प्रतिनिधी)