दोन आठवड्यात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ रक्तसंकलन महायज्ञात सहभाग घेत दादा संगतराम आर्य चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे ट्रस्टच्या सेवाभावामुळे दोन आठवड्यात दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
शिबिराचे उद्घाटन अधिवक्ता माधवदास ममतानी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संत तुलसीदास खुशालानी, वनीता तिरपुडे, सच्चानंद हिरानी, वेदप्रकाश आर्य उपस्थित होते. दादा संगतराम आर्य चॅरिटेबल ट्रस्टने जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. हा स्तुत्य वारसा वेदप्रकाश आर्य पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन अधिवक्ता माधवदास ममतानी व संत तुलसीदास खुशालानी यांनी याप्रसंगी केले. विशेष म्हणजे नासिकराव तिरपुड़े ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
उपक्रमाला डॉ. परमानंद लहरवानी, डॉ. संजय पंजवानी, सोनू केवलरामानी, दयाल चांदवानी, तेजिंदर ओबेरॉय, गीता गालानी, संगीता हरिदामानी, दिलीप हेमराजन, मनीष आर्य, प्रकाश भोयर, मेधावी आर्य, बाबू गंगवानी, जितू केवलरामानी, दिलीप हेमराजन, राजू ग्यानचंदानी, डॉ. गुरुमुख ममतानी, पूरण ममतानी, तरुण रामदासानी, सुरेश सचदेव, सुंदर बुधवानी, प्रियंका पंजवानी, हरिष बिखानी, दीपक मोटवानी, दिलीप सावलानी, दिलीप जैस्वाल, अनिल केसवानी, सुनीर चंदवानी, हरिष चौधरी, राजेश आहुजा, कुमार लाडवानी, भावना बेलानी, नीलम रंगलानी, संगीत सगदेव, हेमा सावलानी, हरिष हेमराजानी, जगदीश खुशलानी आदींनी सहकार्य केले. दादा संगतराम आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.