४ जानेवारीपासून बदल : न्यायमूर्तीद्वय गवई व देशमुख यांच्याकडे जनहित याचिकानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नाताळाच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर कार्यरत होणार आहे. न्यायालयाला २४ डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१६ पर्यंत नाताळाच्या सुट्या असून, ४ जानेवारीपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल.नवीन रोस्टरनुसार न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्याकडे जनहित याचिका, लेटर्स पेटेंट अपील्स, १९९८ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २०००, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२, २०१४ व २०१६ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्याकडे युगुलपीठाची सर्व फौजदारी प्रकरणे, प्रथम अपील व इतर न्यायपीठाला न दिलेली दिवाणी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अतुल चांदूरकर यांच्याकडे १९९९, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिकांची जबाबदारी राहणार आहे.एकल न्यायपीठामध्ये न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे फौजदारी प्रकरणे, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, २०११ पासूनच्या द्वितीय अपील्स व किरकोळ दिवाणी अर्ज, न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांच्याकडे प्रथम अपील्स व अपील्स अगेन्स्ट आॅर्डर तर, न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे २००० पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२, २०१४ व २०१६ मधील दिवाणी रिट याचिका, २०१० पर्यंतच्या द्वितीय अपील्स व दिवाणी पुनर्विचार अर्जांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
नाताळाच्या सुट्यानंतर हायकोर्टात नवीन रोस्टर
By admin | Published: December 23, 2015 3:45 AM