नागपूर : सेमिनरी हिल्सच्या ‘वनबाला’साठी नवा ट्रॅक उभारला जाणार आहे. यासाठी डीपीडीसीच्या निधीतून १४ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
काही दिवसापूर्वीच या कामासाठी डीपीडीसीमधून निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात हे काम हाती घेऊन पूर्ण केले जाणार आहे. मागील वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना संक्रमण वाढल्याने मिनी टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती. यानंतर लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यावर काही दिवसापूर्वी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती. यापूर्वी ट्रेनच्या पावणेदोन किलोमीटरच्या ट्रॅकवरील जुने खराब झालेले स्लिपर बदलण्याचे काम करण्यात आले होते. लाखो रुपये खर्चून नवे लाकडी स्लिपर लावण्यात आले होते. मात्र एक वर्षातच लाकडी स्लिपरला वाळवी लागली. बघता बघता ते वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने काही महिन्यातच गायब झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी लोखंडी ट्रॅक अधांतरी दिसत आहेत. काही स्लिपर एका बाजूने पूर्णत: सडले आहेत. अशा परिस्थितीत धोका होण्याचा संभव असल्याने ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वीदेखील अनेकदा ट्रॅक दुरुस्तीचे काम झाले आहे. मात्र थोडे थोडे काम होत असल्याने समाधान नव्हते. आता मात्र नव्याने संपूर्ण ट्रॅक टाकला जाणार आहे.
...
बॉक्स
रेल्वेला पत्र रवाना
सेमिनरी हिल्स रेंजचे आरएफओ विजय गंगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधीला मंजुरी मिळाली आहे. नव्या ट्रॅकसाठी रेल्वेला आजच पत्रही रवाना केले आहे.
००००