शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात नवा जागतिक विक्रम प्रस्थापित

By admin | Published: July 11, 2016 2:38 AM

नागपुरातील डॉक्टर फॉर फार्मर्सच्या चमूने शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या २९५ डॉक्टरांना एकत्र करून रविवारी

डॉक्टरांचा पुढाकार : रेकॉर्डब्रेक होताच साजरा केला आनंदोत्सवनागपूर : नागपुरातील डॉक्टर फॉर फार्मर्सच्या चमूने शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या २९५ डॉक्टरांना एकत्र करून रविवारी सकाळी ९.३० वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर एकमेकांना तपासून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रेकॉर्ड होताच डॉक्टरांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.डॉक्टर्स फॉर फार्मर्सच्या चमूतील डॉ. संजय दाचेवार, डॉ. सूरज करवाडे, डॉ. पृथा कोसे, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल करवंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, श्री आयुर्वेदिक कॉलेज, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कृष्णराव पांडव आयुर्वेदिक महाविद्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय, ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय, लता मंगेशकर मेडिकल कॉलेज, व्हीएसपीएन डेन्टल कॉलेज, काळमेघ डेन्टल कॉलेजच्या डॉक्टर, प्राध्यापकांना एकत्र केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर २९५ डॉक्टर एकामागे एक लांब शृंखलेत उभे झाले. त्यांनी एकमेकांच्या पाठीला स्टेथास्कोप लावून अमेरिकेचा रेकॉर्ड मोडला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे २७४ डॉक्टरांची साखळी तयार करून एकमेकांना स्टेथास्कोपच्या साह्याने तपासण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करून गिनीज वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली होती. नागपुरात हा रेकॉर्डब्रेक करून डॉक्टरांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी निरीक्षक म्हणून वसंत झाडे, अंजू चोपडा, गौरी रंगनाथन, भारतीय कृष्ण विद्या विहारच्या नागलक्ष्मी उपस्थित होत्या. या रेकॉर्डची इंडिया बुक रेकॉर्डला नोंद झाली असून यातील महत्त्वाचे पुरावे, चित्रीकरण या सर्व बाबी गिनीज वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डकडे पाठविल्यानंतर या विक्रमाची नोंद जागतिक पातळीवर होणार आहे.(प्रतिनिधी) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतरेकॉर्ड करण्यापूर्वी आयोजित एका समारंभात आत्महत्या करणाऱ्या पाच शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी सात हजाराचा धनादेश देण्यात आला. यात चंदन पवार, स्नेहल गुल्हाने, आकाश हळदे, पवन हळदे, विश्वजित देशमुख यांना ही मदत करण्यात आली. कार्यक्रमाला शिक्षक आमदार नागो गाणार, अमिताभ पावडे, प्राचार्य अनिल करवंदे, डॉ. संजय दाचेवार उपस्थित होते. यावेळी आ. नागो गाणार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची घोषणा केली. तसेच प्राचार्य डॉ. अनिल करवंदे, डॉ. केशव भगत, शारदा बत्तुलवार यांनीही प्रत्येकी एक मुलगा दत्तक घेण्याची घोषणा केली.