शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

देशासाठी नवीन वर्ष अस्थिरतेचे

By admin | Published: December 30, 2014 12:52 AM

हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय

हर्षल-नेपच्यून-प्लुटो आणणार अशांतता : ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांचे भाकीत नागपूर : हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविले आहे. ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांच्यानुसार भारताच्या मकर राशीकडून तृतीय आणि नवम स्थानातून २०१५ या वर्षातील ग्रहणे होत असल्यामुळे, या वर्षात होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये गोंधळ निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अपयश संभवते. विश्व क्रिकेट स्पर्धेत धोनी ब्रिगेडने सावध राहणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या खेळाडूंना यावर्षी निवृत्ती घ्यावी लागेल. यावर्षी होणाऱ्या ग्रहणाचा परिणाम म्हणजे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस होण्याचे ग्रह संकेत आहेत. सीमाप्रश्न पुन्हा चर्चेत येईल. ३७० कलमावरून काश्मीरमध्ये तणाव निर्माण होईल. विदर्भात वेगळ्या विदर्भाची मागणी वाढेल. पाकिस्तान, चीनच्या सीमा अशांत राहतील. ग्रहणाच्या जवळपास देशाची अंतर्गत शांतता बिघडण्याचे ग्रहसंकेत मेदिनीय ज्योतिष दर्शवीत आहे, असेही आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. सायन पद्धतीने प्लुटोचे भ्रमण मकर राशीतून चालू राहणार आहे. याचा परिणाम उद्योगधंदे, कामगार, श्रमजीव संघटना, राजकीय क्रांती, मोठ्या व्यक्तींचे स्फोटक, अपघाती मृत्यू तसेच मोठे उद्योग बंद पडण्याची शक्यता जास्त राहणार आहे. कन्या राशीतील राहूमुळे जो निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करीत आहे. त्यामुळे संसर्गजन्य विकार वाढतील. पोलीस, सेना यांना हे वर्ष त्रासदायक राहणार आहे. मीनेतील केतूच्या भ्रमणामुळे विमानसेवा किंवा अंतराळ यान यांच्या सेवेत खंड पडेल. उपग्रहाच्या सेवेत बिघाड होईल, असे भाकीतही डॉ. वैद्य यांनी केले आहे. भारताच्या मकर राशीतून शनिचे भ्रमण लाभस्थानातून होत आहे. यामुळे देशातील सामान्य जनतेच्या दृष्टीने अनुकूल बदल होतील. गरीब जनतेसाठी नवे कायदे, घटना अस्तित्वात येतील. परंतु लाभस्थानात शनि असल्यामुळे देशाच्या उत्पन्नात घट होईल. वर्षाच्या पूर्वार्धात कर्केच्या गुरूमुळे शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल. अभ्यासक्रमात मोठे बदल होतील. विमा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धार्मिक पक्ष किंवा धार्मिक व्यक्तींना महत्त्व प्राप्त होईल, असे ग्रहसंकेत असल्याचे डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे. २०१५ च्या ग्रहस्थितीनुसार डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. धार्मिक कलह रोखण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. प्रसार माध्यमांसाठी काही मार्गदर्शक सूत्रे अमलात येण्याची शक्यता आहे. तसेच नेटवर्कच्या काही साईटस्वर बंदी घालण्याचे ग्रहसंकेत असल्याचेही डॉ. वैद्य यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)