नवरा अन् सासूवर आरोप : पित्याची पोलिसांकडे तक्रार नागपूर : अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेला तिचा संशयखोर पती आणि सासूने हुंड्यासाठी विष पाजून ठार मारले. भांडेवाडीतील अंतुजीनगरात ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून मृत तरुणीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी मायलेकावर गुन्हा दाखल केला आहे.अश्विनी संदीप ठाकरे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या पित्याचे नाव दिनकर प्रभाकर माकुमे (वय ४९) असून, ते नागोबा गल्ली, इतवारी येथे राहतात. भांडेवाडी, अंतुजीनगरात राहणारा संदीप याच्यासोबत अश्विनीचे लग्न ७ मे २०१५ ला झाले. संदीप वाहनचालक असून, त्याच्या परिवारात आई, बहीण सरिता आणि दीर स्वप्निल राहतात. लग्नाच्या दोन-तीन महिन्यानंतरच संदीप अन् त्याची आई अश्विनीचा छळ करू लागले. लग्नात दुचाकी मिळाली नाही, त्यामुळे तू माहेरून दुचाकी घेऊन माग किंवा पैसे आण, असे मायलेकाचे म्हणणे होते. संदीप संशयखोर होता. तो अश्विनीला कुठे जाण्यास, बोलण्यास मनाई करीत होता. अश्विनी जेव्हा जेव्हा माहेरी आली तेव्हा तिने आपली छळकथा आई-वडिलांना सांगितली. मात्र, ठीक होईल सर्व, असे सांगत आईवडील तिची समजूत काढत होते. काकूंकडून पळतच गेलीनवविवाहितेची विष पाजून हत्यानागपूर : घटनेच्या काही वेळेपूर्वी अश्विनी बाजूलाच राहणाऱ्या काकूंच्या घरी गेली होती. तिच्या मागेच आरोपी संदीप आला. त्याच्या धाकामुळे अश्विनी काकूंशी न बोलताच आपल्या घरी परत गेली. अश्विनीच्या मृत्यूचे वृत्त कळताच तिच्या माहेरच्या मंडळीचा असंतोष तीव्र झाला. परिणामी मेडिकलमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, शोकसंतप्त दिनकर माकुमे यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. अश्विनीला तिचा नवरा आणि सासूने मारहाण करून विष पाजून ठार मारले, असा तक्रारीत आरोप केला. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक एस. टी. अंभूरे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे अंतुजीनगरात तीव्र शोककळा पसरली आहे.२ मार्चला सायंकाळी अश्विनी पतीसह माहेरी आली. दीड-दोन तासांतच संदीपने तिला सासरकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून मारहाण करीत सोबत नेले. रात्री ८.३० वाजता अश्विनीच्या काकू ज्योती यांच्या मोबाईलवर फोन केला. अश्विनीच्या आईच्या घरून परत येत असताना रस्त्यात मी खर्रा घेण्यासाठी थांबलो असता अश्विनी कुठे तरी निघून गेली असे त्याने सांगितले. काकूने हा प्रकार अश्विनीच्या आईवडिलांना कळविला. त्यामुळे वडील दिनकर माकुमे आपल्या भावाला सोबत घेऊन अश्विनीच्या घरी गेले. यावेळी तिची सासू, दीर स्वप्निल आणि नणंद सरिता बाहेर उभे होते. तर, आतमध्ये पलंगावर अश्विनी अर्धवट बेशुद्धावस्थेत पडून होती. तिच्या तोंडातून विषासारखा वास येत होता अन् शरीरावर मारहाणीच्या खुणाही दिसत होत्या. त्यामुळे वडील आणि काकांनी तिला उचलून आपल्या मोटरसायकलने पारडीतील खासगी रुग्णालयात नेले. तेथे ती ८ मार्चला शुद्धीवर आली. डॉक्टरांच्या सल्ल्यावरून पोलिसांनी तिचे बयाण घेतले. यावेळी तिने नवरा आणि सासूने जबरदस्तीने विष पाजल्याचे सांगितले. ९ मार्चला अश्विनीची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरून अश्विनीला तिच्या माहेरच्यांनी मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी अश्विनीला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
नवविवाहितेची विष पाजून हत्या
By admin | Published: March 12, 2016 3:17 AM