लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानांचे नाईट पार्किंग ८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.नागपूर विमानतळावर हवामान नेहमीच सामान्य असते. दुसऱ्या व्यस्त विमानतळावर पार्किंगसाठी जागा कमी आहे. शिवाय नागपुरात पार्किंगचे शुल्क किफायत असल्यामुळे इंडिगोने हा निर्णय घेतला आहे. पार्किंगला असलेली विमाने सकाळी ६ वाजता कोलकाता व बेंगळुरूकडे रवाना होतील.नाईट पार्किंग पहिल्या महिन्यात नि:शुल्क आहे. नागपुरातून पुणेकडे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे लो कॉस्ट कॅरियर इंडिगो एअरलाईन्स ८ जानेवारीपासून रात्री विमानसेवा सुरू करीत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार कंपनीने अतिरिक्त विमानाची वेळ रात्री १२.१० वाजता निश्चित केली आहे. याच कंपनीचे दुपारी १२.४० वाजता विमान ६ई१३५ पुणेकरिता उपलब्ध आहे. रात्री पुण्यातून नागपूर अखेरचे ठिकाण असल्यामुळे कंपनी विमान नागपुरात पार्क करून हेच विमान सकाळी ६ वाजता बेंगळुरूकडे रवाना होईल.प्रवाशांना उत्तम कनेक्टीव्हिटी आणि प्रथम वेळ देण्याच्या स्पर्धेत कंपनी ‘लो कॉस्ट कॅरियर’करिता तयार आहे. लोकमतने तीन महिन्यांपूर्वी इंडिगोच्या नाईट पार्किंगसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे हे प्रायोगिक तत्त्वावरील पार्किंग असणार आहे. कंपनीला यश आले तर अन्य विमान कंपन्यासुद्धा नागपुरात विमानांचे पार्किंग करण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात केवळ गो एअर कंपनीच्या विमानाचे नाईट पार्किंग सुरू आहे.
नागपुरात इंडिगो विमानांचे ८ पासून नाईट पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:43 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानांचे नाईट पार्किंग ८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
ठळक मुद्देकिफायत शुल्क : हवामान नेहमीच सामान्य