शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

‘पेंच’मध्ये नाईट पेट्रोलिंग सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 1:06 AM

समृध्द निसर्ग व वनसंपदेच्या अनुभवासोबत जंगलातील मुक्त संचार असलेल्या ....

ठळक मुद्देसुरेवाणी बफरझोन : १५ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृध्द निसर्ग व वनसंपदेच्या अनुभवासोबत जंगलातील मुक्त संचार असलेल्या विविध वन्य प्राणी, पक्षी तसेच जैवविविधतेने समृध्द वनसंपदेची पाहणी करण्यासाठी वनविभागातर्फे सफरीची व्यवस्था करण्यात येते. यासोबतच रात्रीचेही जंगल जवळून अनुभवता यावे यासाठी पेंच टायगर प्रकल्पांतर्गत असलेल्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफरझोनमध्ये राज्यातील पहिल्या नाईट पेट्रोलिंग सफारीची सुविधा उपलब्ध झाली आहे.नागपूरपासून केवळ ६० किलोमीटवर असलेल्या पेंच टायगर प्रकल्पाच्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्रात नाईट पेट्रोलिंगची सुविधा उपलब्ध असून येत्या १५ आॅक्टोबरपासून पर्यटकांना नाईट पेट्रोलिंगच्या सफारीमध्ये सहभाग घेणे शक्य होणार आहे. सुरेवाणी परिसरातील १३८ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ४० किलोमीटर परिसरात नाईट सफारीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सायंकाळी ७.३० वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत नाईट पेट्रोलिंग सफारीमध्ये जवळून जंगल अनुभवता येणार आहे.नाईट पेट्रोलिंग सफारीसाठी दरदिवशी केवळ तीन जिप्सी अथवा एसयुव्ही वाहनांनाच परवानगी राहणार आहे. या सफारीसाठी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र पकल्प, झिरो माईल जवळील कार्यालयात बुकिंगची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी येथे सुध्दा सफारीचे बुकिंग करण्याची सुविधा आहे. या सफारीमध्ये वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाºया तसेच निसर्गप्रेमींना प्राधान्य राहणार आहे. एका वाहनामध्ये चार पर्यटक तसेच वाहन चालक व गाईड आणि फॉरेस्ट गार्ड सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे.रात्रीच्या पेट्रोलिंग सफारीचा आनंद घेता यावा यासाठी वनविभागातर्फे याच परिसरात निसर्ग मार्गदर्शन केंद्रामार्फत राहण्याची सुध्दा व्यवस्था केली आहे. यासाठी पाच इको होम, दोन डारमेट्री तसेच भोजनगृह, कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा सुध्दा सुरेवाणी येथे उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्याच्या निसर्ग व वन पर्यटनाच्या क्षेत्रातील हा उपक्रम राज्यात तसेच देशातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.मचाण पर्यटनमचाण पर्यटनांच्या माध्यमातून सूर्यास्तापासून तर सूर्यादयापर्यंत मचानवर बसून निसर्ग व वन्य प्राण्यांना बघण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. सुरेवाणी येथील वनक्षेत्रात यासाठी पाच मचान सज्ज करण्यात आले असून १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पर्यटकांना उपलब्ध होत आहे. फूट पेट्रोलिंग (पायदळ गस्त) ही सुविधा सुध्दा वन विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.