लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ सुधारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’सह (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांना पहिल्या दीडशेमध्ये स्थान मिळाले आहे. ‘व्हीएनआयटी’चा देशात २७ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’चा ३१ वा क्रमांक होता. दरम्यान यंदादेखील ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रँकिंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव सादर केले होते.
आयआयएम पहिल्या ५० मध्येव्यवस्थापन गटामध्ये आयआयएम नागपूरने पहिल्या ५० शैक्षणिक संस्थांत स्थआन मिळविले आहे. आयआयएम चा देशपातळीवरील ४० वा क्रमांक आहे.