लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.कृषी विभागाने नुकसान भरपाईचा आढावा तीन भागात घेतला आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी जमीन व खरडून गेलेल्या शेतीचा समावेश आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ७५१९.४५ हेक्टर आहे. यात ९१६३ शेतकरी बाधित झालेले आहे. यात सोयाबीनचे नुकसान २८८८.०७ हेक्टरचे झाले आहे. तर कापूस ४४७४.८९, धान २३.५१ व तूर पिकाचे नुकसान १३२.९८ हेक्टरवर झाले आहे. ३३ टक्केपक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६८०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच्या हिशेबाने ५ कोटी ११ लाख ३२ हजार २६० रुपये अपेक्षित आहे. तर शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी शेतजमीन १५.६७ हेक्टर आहे. जिल्ह्यात अशा ७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना १२२०० रुपये हेक्टरी प्रमाणे १ लाख ९१ हजार १७४ रुपये अपेक्षित आहे. तर संपूर्ण पीकच वाहून गेलेल्या म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ १०४५.८८ हेक्टर आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २०४८ असून, ३७५०० रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाल्यास ३ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपयांची अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या या तीनही भागाच्या नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) व नुकसान भरपाई (रुपयात)नागपूर ग्रा. ११०६.५१ १०६६४८७८हिंगणा ११००.९४ ३५८३४५८०कामठी ६ ४०८००मौदा ३६६.९६ ३१९०३७६उमरेड १५०९.९० १०२६७३२०भिवापूर ६०८.४८ ४१४६९५२कुही ३८००.१७ २५८४११५६सावनेर ६६.१८ ४५००२४पारशिवनी ० ०कळमेश्वर २.६० १७६८०रामटेक १३.२६ ९०१६८जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने तीन तालुके व आठ मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. अशावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.विनोद पाटील, सदस्य, कृषी समिती, जि.प.