लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटच्या मालकालाही कारवाईला सामोरे जावे लागले.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक स्वाती काकडे यांनी धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्या मालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. यात दारू विक्रीचा परवाना नसताना ग्राहकांना दारू पुरविणे, ग्राहकांनी दारू सोबत आणली असल्यास त्यांना दारू पिण्यासाठी सेवा पुरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. यात कलम ६८ नुसार ग्राहकांना दारू पिण्यासाठी सेवा पुरविणाऱ्या धाबा, रेस्टॉरंट मालकास २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर दारू पिणाऱ्या ग्राहकांना वैद्यकीय चाचणीत दारू पिलेली आढळल्यास पाच हजाराचा दंड आणि एक ते तीन महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे. पारडी मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्रबुद्धे, उपनिरीक्षक रावसाहेब कोरे, एम. पी. चिटमटवार, विशाल कोल्हे, कॉन्स्टेबल नीलेश पांडे, सुधीर मानकर, समीर सय्यद अचानक धाड टाकली. त्यांना नऊ ग्राहक दारू पिऊन आढळले. त्यांच्याविरुद्ध कलम ६८ नुसार कारवाई करण्यात आली तर त्यांना सेवा पुरविल्याबद्दल रेस्टॉरंटच्या मालकावरही विभागाने कारवाई केली आहे. भविष्यात ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी धाबा, रेस्टॉरंटमध्ये मद्य सेवन करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
नागपुरात रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:21 PM
धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा देणाऱ्या रेस्टॉरंटच्या मालकालाही कारवाईला सामोरे जावे लागले.
ठळक मुद्देसेवा देणाऱ्या मालकावरही कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहीम